Thursday, May 1, 2025
Homeधुळेकामात कुचराई,भांडारपालावर शिस्तभंगाची कारवाई करा

कामात कुचराई,भांडारपालावर शिस्तभंगाची कारवाई करा

धुळे dhule। प्रतिनिधी

महापालिकेचे भांडारपाल (Treasurer of Municipal Corporation) व आरोग्य विभागाचे (Health Department) प्रभारी कार्यालयीन अधिक्षक राजेंद्र माईनकर हे स्वच्छतेच्या कामात कुचराई (Poor work) करत असल्याने त्यांच्याकडून पद्भार काढून घ्यावा व त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची (Disciplinary action) कारवाई करावी, असे निर्देश सभापती (Chairman) किरण कुलेवार यांनी दिले.

- Advertisement -

महापालिकेच्या सभागृहात आज स्थायी समितीची सभा सभापती किरण कुलेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, उपायुक्त विजय सनेर, संगिता नांदुरकर, सुनिल बैसाणे, नरेश चौधरी, कल्यार्णी अंपळकर, विजय जाधव, साबीर खान, वसीम बारी, फातेमा अन्सारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेची वेळ सकाळी 11 वाजेची होती. परंतू सभा 11.50 सुरु झाली. याबाबत सभापतींनी खुलासा केला. त्या म्हणाल्या की, भाजपाचा आज वर्धापन दिवस असल्याने विविध कार्यक्रम होते. त्यामुळे सभेला उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले.

काल शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याजवळ स्वच्छता करण्यासाठी माईनकर यांना रात्री 9 वाजता व नंतर 11 वाजता मोबाईलवरुन फोन केला. परंतु, त्यांनी उचलला नाही. त्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे सांगूनही त्यांनी स्वच्छता केली नाही. अशा बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्याकडून पदभार काढून तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश सभापती कुलेवार यांनी दिले.

धुळेकरांना अक्कलपाड्याचे पाणी कधी मिळेल? याचा खुलासा करावा असे सुनिल बैसाणे यांनी सांगितले. त्यावर प्रशासनाकडून एप्रिल अखेरपर्यंत पाणी मिळणार असल्याचे सांगितले.

अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेमुळे धुळेकरांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी मनपाचे अधिकारी वेळोवेळी भेट देऊन विविध गोष्टींची पुर्तता करीत आहेत, परिश्रम घेत आहेत. त्यामुळे अक्कलपाड्याचे पाणी ज्या दिवशी धुळेकरांना मिळेल, त्या दिवशी सर्व अधिकार्‍यांचा पक्षाच्या वतीने सत्कार करणार असल्याचे बैसाणे यांनी सांगितले. विषयपत्रिकेवर सर्व सहाही विषयांना मंजूरी देण्यात आली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India vs Pakistan War : भारताची पाकला तंबी; नियंत्रण रेषेवर युद्धबंदी...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi  भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan War) लष्करी महासंचालकांनी ऑपरेशन्सच्या हॉटलाईनवर चर्चा केली आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनांवर...