Friday, March 28, 2025
Homeमुख्य बातम्यामनमाडला रेल्वे ओव्हरब्रिजचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिजचा भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

येथून जाणाऱ्या इंदुर-पुणे महामार्गावरील ब्रिटीशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग आज पहाटे कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे इंदूर-पुणे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

आज पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान या पुलाचा पूर्वेकडे असलेला काही भाग सुरक्षा कठड्यासह कोसळला. सुदैवाने त्यावेळी कुठल्याही प्रकारचे वाहन पुलावर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून वळवण्यात आली आहे. तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली आहे.

विंचूर प्रकाशा महामार्गावरील वाहतूक ठप्प

विंचूर प्रकाशा महामार्गावरून वाहतूक वळवल्याने लासलगाव-विंचूर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. या महामार्गावर दोन्ही बाजूकडील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. लासलगाव पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने लासलगाव व विंचूर येथे पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

दरम्यान, तीन दिवसानंतर आज ढगाळ वातावरण निवळल्याने कडक ऊन पडले. त्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या आवारावर कांद्याची आवक वाढली. सकाळच्या सत्रात ५८३ वाहनांचा कांद्याचा लिलाव होऊन व्यापाऱ्यांच्या खळ्यात कांदा उतरवण्यासाठी वाहनांची मोठी गर्दी झाल्याने याचा देखील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे काही काळासाठी वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांची चौकशी होणार

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती कल्पना चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे प्रथमदर्शनी आढळून...