Sunday, October 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे;...

Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; चिवटे अर्ज भरण्यावर ठाम

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Elections for Teachers’ and Graduates Constituencies) भाजपने पाचपैकी तीन मतदारसंघातील उमेदवारांची आज (रविवारी) घोषणा केली. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची मागणी धुडकावून लावत भाजपने अनुक्रमे पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवार दिला आहे. त्यामुळे महायुतीत (Mahayuti) बंडखोरीची चिन्हे आहेत.

- Advertisement -

विधानपरिषदेच्या  पुणे,नागपूर, औरंगाबाद पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या, मंगळवारी शेवटची मुदत आहे. विधान परिषदेच्या पाचपैकी पुणे आणि अमरावती शिक्षक या दोन जागांसाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. तर पुणे पदवीधरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) दावा केला होता. परंतु, भाजपने  दोन्ही मित्र पक्षांची मागणी मान्य केली नाही. परिणामी शिंदे गटाला अमरावती शिक्षक आणि अजित पवार गटाला औरंगाबाद पदवीधर अशा एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.

मंगेश चिवटे अर्ज भरण्यावर ठाम

शिवसेना शिंदे गटाने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी स्वाभिमानी एकनाथ आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून शिंदे गटाचे मंगेश चिवटे (Mangesh Chivate) निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यात पुणे विभागातील शिक्षकांशी संपर्क वाढवला आहे. भाजपने (BJP) या जागेवर उमेदवार दिला असला तरी शिंदे गटाचे उमेदवार मंगेश चिवटे पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा लढवण्यावर ठाम आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला आपण पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरणार असल्याचे चिवटे यांनी जाहीर केले आहे. चिवटे आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्यास पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.

भैय्या माने अपक्ष म्हणून रिंगणात

भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघाची जागा न सोडल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्ती प्रताप उर्फ भैय्या माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार माने हे आपल्या समर्थकांसह आज,सोमवारी किंवा उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीची मुदत ९ ऑक्टोबर अशी आहे. त्यामुळे माघारीपर्यंत महायुतीकडून  बंडखोरी  शमवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

भाजपचे विधान परिषद उमेदवार

पुणे पदवीधर : डॉ. स्मिता योगेश जाधव
नागपूर पदवीधर : सुधाकर कोहळे
पुणे शिक्षक : कौस्तुभ गावडे

ताज्या बातम्या