नाशिक | Nashik
इर्शाळवाडी (ता. खालापूर) (Irshalwadi Landslide) येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगडावरील (SaptaShrungigad) ग्रामस्थ व भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्तश्रृंगी गडावरील काही भाग धोकादायक स्थितीत असून संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभाग व सार्वजनिक विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामपंचायतीने केली आहे. आई भगवती मंदिराच्या पायऱ्यांच्या परिसरात भूस्खलन झालेल्या धोकादायक भागात त्वरित उपाययोजना करणे गरजे आहे. याबाबत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र दिले आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातल्या इर्शाळगडाखाली वसलेल्या इर्शाळवाडीवर मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगराचा वरचा कडा तुटून या वाडीवर पडला. दोन्ही भागांकडून मोठमोठे दगड कोसळल्याने ४९ घरांपैकी मधल्या भागातील सात ते दहा घरे वगळता सर्व घरे राडारोड्याखाली दबली. या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला.
आधी मणिपूरमधील… ; खासदार संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टिका
या पार्श्वभूमीवर नाशिकचा (Nashik) सप्तशृंगी गड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सप्तशृंगी गडदेखील (Saptshrungi Devi) असाच भव्य कातळाच्या डोंगराच्या पायथ्याशी स्थित असून या ठिकाणी भलीमोठी वस्ती आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण दुर्घटनेनंतर सप्तशृंगी गडाचा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यावेळी देखील स्थानिक ग्रामपंचायतीने पत्र दिले होते.
दरम्यान सप्तश्रृंगी गडावर माळीण सारखी दुर्घटना होण्याची भीती असून गडावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला माती साचल्याने दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गडावरील पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचा विरोधी पक्षनेतेपदासाठी शड्डू; काँग्रेस हायकमांडला पाठविले ३० आमदारांच्या सह्यांचे पत्र
दरम्यान याबाबतच्या पाहणीत अतिवृष्टी झाल्यास भविष्यात लोकवस्तीजवळील डोंगराच्या पायथ्याचा भाग कोसळू शकतो अशी शक्यता वर्तवित उपाययोजना कराव्यात असे वनविभागाने म्हटले आहे.गडाच्या पायथ्याशी संपूर्ण गाव वसलेले असल्याने तात्काळ संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी करण्यात आली आहे. इर्शाळवाडीची घटना घडण्याच्याच दिवशी १९ जुलैला पत्र पाठवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज कळवण तहसील कार्यलयात बैठक होणार असून यासाठी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या ठिकाणी राज्यासह देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. दररोज पंधरा ते वीस हजार भाविकांची अस्थायी लोकसंख्या असते. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असते.यापूर्वीही अशा स्वरूपाची दुर्घटना घडलेली असल्याने शासनाने भविष्यातील भीषण दुर्घटना टाळण्यासाठी दरडींना अटकाव करण्यासाठी लोखंडी संरक्षक जाळीचे कवच तसेच रॉक फॉल बॅरिअरचे काम केल्याने दरड कोसळण्याचा संभाव्य धोका काहीसा टळला असला तरी ही उपाययोजना पुरेशी होऊ शकत नाही अशी सध्याची स्थिती आहे.
आजमितीस श्री भगवती मंदिर परिसरातील पायऱ्यांवरील रामटप्पा, कासवटप्पा व रोपवे मार्गाच्या परिसरापासून पहिल्या पायरीपर्यंतच्या काही भागातील माती व दगड ढासळलेले आहेत. हा भाग हा ठिसूळ दगड, मुरुमयुक्तमातीचा असल्याने या भागातील माती पावसाळयात खाली वाहून येते. भाग हा वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने सरपंच रमेश पवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपरिक्षेत्र कार्यालय कळवण यांना महिनाभरापूर्वी तसेच आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आदींना पत्र देवून कार्यवाहीची मागणी केली आहे.
आपत्कालीन परिस्थितीचे योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदतकार्य प्रक्रियेचे नियंत्रण तसेच पूर्ततेसाठी १४ जुलैला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विशाल नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ राजीव चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गडावर झालेल्या बैठकीतही सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, तसेच ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी सदरच्या संभाव्य धोकादायक भागाचा मुद्दा उपस्थित केला.
VIDEO : राजस्थानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत
काय म्हंटले पत्रात
सह्याद्री पर्वताच्या पूर्व- पश्चिम पर्वतरांगेत डोंगर पठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे एक हजार ४८० मीटर उंचीवर निसर्गसौंदर्य व भक्तिभावाने भारावलेला सप्तशृंगी गड (वणी) सात शिखरांचे (शृंगे) स्थान म्हणून ओळखले जाते. सप्तशृंग गड हे माळीण आणि आता इर्शाळवाडी येथील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर अति संवेदनशील धार्मिक व पर्यटनस्थळ म्हणून गणले जाऊ लागले. गडावर देवीचे मंदिर डोंगराच्या कपारीत असल्याने पावसाळ्यात डोंगर कपारीतील धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असते.
यामुळे काही महिन्यापूर्वी सरकारकडून आधुनिक पद्धतीने संरक्षित जाळी (गर्डर) बसवण्यात अली आहे. मात्र सद्यस्थिती मंदिर पायऱ्यांवरील राम टप्पा, कासव टप्पा व रोप वे मार्गाचा परिसर ते पहिल्या पायरीपर्यंतच्या भाग हा ठिसूळ दगड, मुरुमयुक्त असल्याने या भागातील माती पावसाळ्यात खाली वाहून येते. परिसरात खालच्या बाजूला सुमारे चार हजार लोकसंख्येची नागरी वस्ती आहे. धोकादायक भागातून पावसाळ्यात मुरुम मातीचा भाग खचून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.