औरंगाबाद – प्रतिनिधी – Aurangabad :
सकाळी साडेअकरा वाजता महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पुढच्या आठवड्यात म्हणजेच सोमवारपासून शहरात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याचे सांगताच औरंगाबादकरांची एकच भंबेरी उडाली.
दुकानांमध्ये, मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी झुंबड केली. दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मध्यस्थी करत लॉकडाऊनचा एकतर्फी निर्णय अयोग्य असल्याचे सांगत आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक व्हाट्स अप मेसेज जारी केला, तो असा-
“मी रविवारी रुजू होईल. रविवारी संध्याकाळी माझ्या निवासस्थानी मनपा, पोलीस प्रमुखाची बैठक होईल. लोकांच्या डोक्यात दगड घातल्याप्रमाणे निर्णय होणार नाही.
लॉकडाऊन करण्याचा निर्णय एकट्याने घ्यायचा नसतो. याबाबत जे काही होईल, ते बैठकीनंतर होईल. लोकांना त्रास होईल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.
संसर्ग किती वाढला आहे, त्याचे मूल्यांकन होईल. यानंतर लॉकडाऊन करायचे की नाही, याबाबत जिल्हा आपत्ती निवारण प्रमुख म्हणून मी जाहीर करील.