नाशिक । प्रतिनिधी | Nashik
राज्यभरातील ग्रामपंचायत (gram panchayat) निवडणुकांची (election) रणधुमाळी सुरू आहे.
यासाठी निवडणुकीकरिता जाहीर कार्यक्रमानुसार नव्याने निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य (Gram Panchayat Member) हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors of Market Committee) निवडणूकीत मतदान (voting) करण्यापासून वंचित राहतील.
त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणाऱ्या सदस्यांची नावे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee) मतदार यादीत (voter list) समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका (election) पुढे ढकलण्यात येत असल्याचे शासनाने काढलेल्या आदेश पत्रात म्हटले आहे. संपूर्ण राज्याबरोबरच नाशिक जिल्हयातील (nashik district) १४ कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकीकरिता प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर हरकती प्रक्रीया सुरू आहे. मात्र, राज्य शासनाने (state government) बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका १५ मार्च २०२३ पर्यंत स्थगित केल्या आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Cooperative Election Authority) जाहीर केल्याप्रमाणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घेतल्यास, नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान (voting) करण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे या नवनिर्वाचित सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
करोना (corona) संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर २०२२ मध्ये मुहुर्त लागला होता. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८१ सह नाशिक जिल्हयातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा (Agricultural Produce Market Committee) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यात २९ जानेवारी मतदान तर ३० जानेवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता.
या कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या गत महिन्यात जाहीर झाल्या. जाहीर झालेल्या मतदारद्यांवर हरकती मागविण्याची प्रक्रीया बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. हरकतींवर सुनावणी होऊन डिसेंबर अखेर, अंतिम मतदार यादी जाहीर होऊन अर्ज दाखल केले जाणार होते. त्यासाठी तालुकास्तरावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या.दरम्यान, राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेबंर २०२२ च्या पत्रान्वये राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू शकतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत निवडणूका घेण्यात येऊ नये,असे पत्रात म्हटले आहे.
या आहेत १४ बाजार समित्या
यासंदर्भात, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका 15 मार्च 2023 पर्यंत स्थगित करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्हयातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांसाठी निवडणुक प्रक्रीया सुरू झालेली होती. त्यावर हरकती देखील प्राप्त झाल्या होत्या. मात्र, निवडणुका स्थगित झाल्या आहेत.