Tuesday, September 24, 2024
Homeनगरशक्तीवर्धक औषधे देण्याच्या नावाखाली फसवणूक

शक्तीवर्धक औषधे देण्याच्या नावाखाली फसवणूक

11 लाखांना व्यावसायिकाला चुना || भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शक्तीवर्धक औषधांचा पुरवठा न करता एका व्यावसायिकाची 11 लाख 29 हजार 900 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. रामचंद्र जनार्धन बाबर (वय 46 रा. माधवबाग, आलमगीर, नागरदेवळे, ता. नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. दरम्यान, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राज ठाकूर (पूर्ण नाव नाही, रा. चित्तोडीयानगर, कामशेत, ता. लोणावळा, जि. पुणे) याच्याविरूध्द रविवारी (22 सप्टेंबर) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची घटना 19 जून 2024 रोजीच्या पूर्वी सुमारे सात ते आठ दिवस अगोदर फिर्यादी बाबर यांच्या दुकानावर माधवबाग, आलमगीर येथे घडली आहे. रामचंद्र बाबर यांचे माधवबाग, आलमगीर येथे दुकान आहे. 19 जून रोजीच्या पूर्वी सुमारे सात ते आठ दिवस अगोदर (तारीख नाही) राज ठाकुर हा बाबर यांच्या दुकानावर आला होता. तो बाबर यांना म्हणाला, ‘तुम्ही तुमच्या दुकानात मी दिलेले शक्तीवर्धक औषधांची विक्री करा, त्यात तुम्हाला अधिक नफा मिळेल’ असे म्हणून बाबर यांना अधिक नफा मिळून देण्याचे आमिष दाखविले व त्यांचा विश्वास संपादन केला. ठाकूरने बाबर यांना धमकी देऊन फोन पे व आरटीजीएसव्दारे 11 लाख 29 हजार 900 रुपये घेतले.

दरम्यान, ठाकूरने बाबर यांना कोणतेही शक्तीवर्धक औषधांचा पुरवठा केला नाही. पैसे परत मागितले असता बदनामी करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे बाबर यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. पोलिसांनी अर्ज चौकशी करून रविवारी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार डी. पी. शिंदे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या