Saturday, September 26, 2026
Homeनाशिकनाशिकरोडच्या अनेक भागात बत्ती गुल

नाशिकरोडच्या अनेक भागात बत्ती गुल

नागरिकांमध्ये संताप

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोडच्या अनेक भागात गेल्या तीन तासापासून वीज पुरवठा खंडित झाला असून त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दूरध्वनीवरून देखील संपर्क होऊ शकत नसल्याने दाद कोणाकडे मागायची असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसापासून नाशिकरोड परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे आज सुद्धा नाशिक रोड परिसरात पाऊस नसताना गेल्या तीन तासापासून वीज पुरवठा खंडित झाला आहे देवळाली गाव अनुराधा चौक सुभाष रोड आर्टिलरी सेंटर रोड जैन भवन परिसर या भागातील वीजपुरवठा तीन तासापासून खंडित झाला आहे .

याबाबत नागरिक महावितरण अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क करीत आहे परंतु संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही त्या मुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून याबाबत लवकरच नाशिक रोड परिसरातील नागरिकांच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी घेराव घालण्यात येणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान पुढील आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे सुनील देवकर यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

चांदा येथे मुळा उजव्या कालव्याचा भराव खचला; प्रशासनाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना...

0
चांदा । वार्ताहर मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच नेवासा तालुक्यातील चांदा गावाच्या बसस्थानकाजवळच कालव्याचा भराव मोठ्या प्रमाणावर खचल्याने अचानक ग्रामस्थ व प्रशासनाची धावपळ उडाली....