Saturday, May 25, 2024
Homeनाशिकवीजेचे खांब व तारा रस्त्यावर पडून

वीजेचे खांब व तारा रस्त्यावर पडून

येवला । प्रतिनिधी Yevla

तालुक्यातील आडगाव चोथवा ( Yevla- Aadgaon- Chothva ) येथे गेल्या सहा – सात दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ( Mahavitaran) पोल पडले असून या पोलचा व वीज पुरवठा करणार्‍या तारां रसत्यात पडल्या असूनही महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नसल्याने परिसरातील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

शेतकर्‍यांच्या या तक्रारींची दखल घेउन विजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. आठवडाभरापासून वीजपुरवठा खंडीत झाला असून वीजपुरवठा करणार्‍या तारा रस्त्यातच पडलेल्या आहेत.

संबधितांना कळउनही महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी लक्ष देत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. निवेदनावर शरद शिंदे, अशोक शिंदे, दत्तू शिंदे, सर्जेराव खोकले, दिलीप पवार, वाल्मिक शिंदे, भाउसाहेब वाढवणे यांची नावे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या