Saturday, July 27, 2024
Homeनगरप्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकरी सभासदांचा विमा हप्ता बँक भरणार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकरी सभासदांचा विमा हप्ता बँक भरणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणून राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश जिल्हा बँकेस प्राप्त झाले असून या पीक विमा योजनेतील शेतकर्‍यांच्या विमा हप्त्याची रक्कम जिल्हा बँक भरणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 पासून जिल्ह्यात लागू झाली आहे. ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीच्यावतीने जिल्हा शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा काढण्यात येणार आहे. यात खरीप हंगामातील बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, भात, मका, कांदा, कापूस व सोयाबीन आदी पिकांचा जिल्ह्यासाठी समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेत खरीप हंगामातील पिकांसाठी संरक्षित रक्कम, विमा हप्ता रक्कम दर राज्य शासनाने निश्चीत केले आहेत. या योजनेत शेतकर्‍यांकडून प्रति पीक अर्ज फक्त 1 रुपया भरून घेऊन विमा उतरवण्यात येणार आहे. त्यानुसार बँकेने कर्जदार शेतकरी सभासदांचा विमा हप्ता रक्कम स्वनिधीतून भरण्याचे ठरविले आहे. त्याचा सर्व कर्जदार शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा.

त्याकरिता कर्जदार शेतकर्‍याने त्याचा ई-पीक पहाणीचा प्रमाणित 7/12 उतारा सादर करणे आवश्यक आहे. याशिवाय कर्ज घेतलेल्या पिकात पाऊस मानानुसार बदल केलेला असल्यास त्याबाबतचे 2 दिवसाचे पूर्व सुचना देणारे पत्रही सादर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमुद केले. या योजनेत बिगर कर्जदार शेतकर्‍यांनाही पिक विमा अर्ज बँकेमार्फत सादर करण्याची सुविधा शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी ई-पीक पहाणीचा प्रमाणीत 7/12, प्रमाणीत 8 अ, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँक पास बुकाच्या खातेनंबर नमुद असलेल्या पानाची झेरॉक्स प्रत, स्वयंघोषणा पत्र व बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज (फॉर्म) सादर करणे आवश्यक आहे. या योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. त्यामुळे विहीत वेळेत विमा उतरवून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासनाच्या या क्रांतीकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे चेअरमन कर्डिले यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या