Saturday, July 27, 2024
Homeनगरपाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी 3 लाख 73 हजार लाभार्थी वाढले

पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी 3 लाख 73 हजार लाभार्थी वाढले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

2011 च्या सामाजिक, आर्थिक आणि जाती सर्वेक्षणाच्या यादीत नाव असणार्‍या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील लाभार्थ्यांना सरकारच्यावतीने प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत पाच लाखांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेसाठी आधी 11 लाख 955 नागरिक पात्र होते. त्यात आता आणखी 3 लाख 73 हजार 166 नागरिकांची भर पडली असून या सर्वांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित करून ती डिजीटल स्वरूपात कार्डमध्ये साठवण्यात येणार आहे. या कार्डला आयुष्यमान डिजीटल कार्ड असे नाव देण्यात आले असून या कार्डाच्या आधारे प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले. 2011 ला झालेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातीसर्वेक्षणाच्या यादीत नावे असणार्‍या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असणार्‍या नागरिकांना सरकारच्यावतीने पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजनेचे कवच देण्यात आले आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात आधी 11 लाख 955 लाभार्थी पात्र होते. यात आता आता रेशनकार्डच्या डाटानूसार 3 लाख 73 हजार 166 नावे वाढवण्यात आली आहे. नव्याने वाढलेली पावणे चार लाख लोकांना पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक सीएससी सेंटरवर जावून पात्र नागरिकांना हे कार्ड काढता येणे शक्य होणार आहे. यात काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

सामाजिक, आर्थिक आणि जातीसर्वेक्षणानूसार पात्र असणार्‍या नागरिकांनी प्रधानमंत्री प्रधानमंत्री जनआरोग्य योजने आरोग्य विम्याचे कार्ड काढून घ्यावे. या योजनेत जिल्ह्यातील 43 रुग्णालयाचा समावेश आहे. काही अडचण असल्यास जिल्हा परिषद आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

लाभार्थी वाढ

अकोले 4 हजार 659 (1 लाख 25 हजार 681), जामखेड 26 हजार 253 (28 हजार 901), कर्जत 9 हजार 802 (54 हजार 296), कोपरगाव 4 हजार 495 (66 हजार 419), नगर 24 हजार 601 (47 हजार 647), नेवासा 6 हजार 909 (92 हजार 16), पारनेर 23 हजार 869 (42 हजार 746), पाथर्डी 11 हजार 576 (49 हजार 198), राहाता 558 (77 हजार 865), राहुरी 11 हजार 716 (65 हजार 555), संगमनेर 78 हजार 972 (1 लाख 1 हजार 301), शेवगाव 34 हजार 946 (52 हजार 543), श्रीगोंदा 40 हजार 602 (27 हजार 62), श्रीरामपूर 10 हजार 8 (56 हजार 493) असे आहेत. (कंसात जुने लाभार्थी).

पात्र रुग्णालये

नगर शहर आणि तालुका 16, संगमनेर 10, राहाता 3, कोपरगाव 2, राहुरी 2, शेवगाव 1, श्रीरामपूर 2, अकोले 2, जामखेड 1, पाथर्डी 1, नेवासा 1 आणि पारनेर 2 अशा 43 रुग्णालयामध्ये प्रधानमंत्री आरोग्य जनआरोग्य योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या