Friday, November 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Election 2024 : 'वंचित' मविआतून बाहेर; लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार, प्रकाश...

Loksabha Election 2024 : ‘वंचित’ मविआतून बाहेर; लोकसभा निवडणुकीत स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत चर्चा सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काल मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा करत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील जागांवर उमेदवार घोषित केले. त्यामुळे आता वंचित महाविकासआघाडीतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना आंबेडकर म्हणाले की, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल.मविआने जरांगे पाटील यांचा फॅक्टर लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यांच्या संघटनेसोबत आम्ही सहयोग करणार आहोत. त्यांनी ३० तारखेपर्यंत थांबा असे सांगितले आहे, असं आंबेडकर यांनी म्हटले.

दरम्यान, उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून (Akola Lok Sabha Constituency) निवडणूक लढवणार आहेत. तर चंद्रपुरातून राजेश बेले, बुलढाण्यातून वसंत मगर, भंडाऱ्यातून संजय केवटे, गडचिरोली हितेश पांडुरंग मडावी, अमरावती प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा प्रा. राजेंद्र साळुंके, यवतमाळ-वाशिम खेमसिंग पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर नागपुरात काँग्रेसच्या विकास ठाकरे यांना तर सांगलीत ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यात आला आहे. तसेच रामटेकच्या जागेवर अद्याप उमेदवार ठरला नसल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या