Wednesday, November 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजप्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; 'या' तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा; ‘या’ तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार

मुंबई | Mumbai
राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. या आरक्षणाच्या मुद्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी एक महत्त्वाची माहिती जारी केली होती. आपण आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा निर्णय जाहीर करणार, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार प्रकाश आंबेडकर यांनी आपला मोठा निर्णय जाहीर केला आहे.

प्रकाश आंबेडकर राज्यात आता एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या यात्रेला २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमी येथून सुरुवात करणार आहे. ही यात्रा कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालन्याला जाईल. यानंतर ७ किंवा ८ ऑगस्टला या यात्रेची छत्रपती संभाजीनगर येथे सांगता होईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांना फसवलं आहे, त्यामुळे ओबीसींच्या हातामध्ये सत्ता द्या अशी मागणी या यात्रेच्या माध्यमातून करणार. गरीब मराठ्यांना टिकाऊ आरक्षणाचे वेगळे ताट मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी म्हटले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“काही लोक नामांतराची आठवण करून देत आहेत. दोन गट पडले आहेत. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद श्रीमंत मराठ्यांनी लावला आहे. काय स्वरुप होईल याची भीती अनेक ओबीसी संघटना आणि नेत्यांना आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीला सर्व मराठा नेते एनसीपीचे, काँग्रेसचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. यात सामंजस्याचा तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष आहेत. त्यात एनसीपी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे आणि उद्धव ठाकरे गट आहे. हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत तोडगा निघणार नाही”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख यांना व्यक्तिगत पत्र लिहावे, मुख्यमंत्री म्हणून पण लिहावे व्यक्तिगत देखील लिहावे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आश्वासन दिले की आम्ही पत्र लिहू, अजूनपर्यंत वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेले नाही, इतर पक्षाला मिळाले का याबाबत आमच्याकडे काहीही खुलासा नाही, असेही आंबडेकर यांनी यावेळी म्हटले.

आरक्षण बचाव यात्रेबद्दल काय म्हणाले?
वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय, मराठवाड्यातून आता ही मागणी पश्चिम महाराष्ट्र खान्देश या ठिकाणी देखील पसरू लागलेली आहे. त्यानुसार, वाशिम आणि बुलढाण्यातील काही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ओबीसी संघटनांची मागणी होती की आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावो गावी गेली पाहिजे. त्यामुळे, या सामाजिक संघटनांना घेऊन २५ तारखेला दादर चैत्यभूमी येथून आपण आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करायची, असे आम्ही ठरवल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या