Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रआगामी निवडणुकांबाबत प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...

आगामी निवडणुकांबाबत प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राज्य तसेच देशात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. त्यातच, वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबत मोठा दावा केला आहे. देशात येत्या पाच महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

- Advertisement -

विरोधकांना निवडणूक लढवण्यासाठी निधीच मिळू नये म्हणून भाजपाने नोटंबदीचा निर्णय घेतला आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच राजकीय पक्षांनी गाफील राहू नये, असा इशारा देत लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत केल्याने आंबेडकर यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

विधानसभा उपाध्यक्षांचा नादच खुळा! पत्नीला खांद्यावर घेत केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ…

यावेळी प्रकाश आंबेडकरांनी आगामी लोकसभा निवडणुकींबाबतही मोठं भाकीत केलं. इथल्या राजकीय पक्षांनी गाफील राहू नये. येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले, भाजपला ६० जागांवर ऑल आऊट करु…

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) जूनपासून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांना महिन्यातून किमान एकदा तरी भेट देतील. तसेच, सरकारी योजनांचे भूमिपूजन करण्याच्या निमित्ताने निवडणुकांचीही तयारी सुरू करणार आहेत, तर मोदी सरकारला ३० मे ला ९ वर्षे पुर्ण होत असून भाजपने आत्तापासून २०२४ च्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या