Monday, January 26, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPrakash Mahajan Resign: मोठी बातमी! मनसे नेते प्रकाश महाजन यांचा राजीनामा; म्हणाले,...

Prakash Mahajan Resign: मोठी बातमी! मनसे नेते प्रकाश महाजन यांचा राजीनामा; म्हणाले, “जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे…”

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. प्रकाश महाजन अनेक दिवसांपासून पक्षात नाराज होते. छत्रपती संभाजीनगरात हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. माझी अपेक्षा नव्हती पण उपेक्षा झाली, असे म्हणत त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली.

पक्षाचे काही ठराविक कार्यक्रम आणि मेळाव्यांपासून प्रकाश महाजन यांना लांब ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मनसेच्या नाशिकच्या मेळाव्याला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आले नव्हते, म्हणून प्रकाश महाजन दुखावले गेले होते. त्यांनी आपली खदखद बोलून दाखवत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. गंगेला बोल लावला तेव्हा खरतर मी तेव्हाच थांबायला हवे होते, मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा ही अपेक्षा पण वाटेल उपेक्षा आली, असे म्हणत महाजन यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. महाजन यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

प्रकाश महाजन काय म्हणाले?
मी प्रकाश महाजन माझा राजकीय परिचय आपणास दिला पाहिजे असे नाही. आज मी तुमच्यासमोर या गोष्टीसाठी आलो आहे कुठेतरी आपण आता थांबले पाहिजे ही भावना गेली काही दिवसांपासून माझ्या मनात सारखी येत आहे. खरे म्हणजे मी गंगेला बोल लावला त्याच वेळी थांबायला पाहिजे होते. खरं म्हणजे पहेलगामच्या वेळी मी थांबायला पाहिजे होते. पण त्यावेळी मला असे वाटले की कुठेतरी काहीतरी सुधारणा होईल. व्यक्तिगत म्हणाल तर माझ्यापेक्षा अत्यंत कमी आहे. कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला निवडणुकीचा तिकीट मिळण्याची गरज नव्हती. कुठल्या पदाची गरज नव्हती. फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती. परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवून सुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली. लोकसभेच्या रणधुमाळीत कधी मला विचारण्यात आले नाही, विधानसभेच्या वेळी प्रचारापुरते मला वापरण्यात आले. जी जी जबाबदारी माझ्यावर देण्यात आली ती मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली, असे प्रकाश महाजन म्हणाले.

YouTube video player

जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले
माझ्या कामाचं कौतुक नाही, मग माझ्या हातून जा चुका झाल्याच नाहीत त्याचे बोल मला लावण्यात आले. जे पाप माझ्याकडून घडले नाही, त्याचे प्रायचित्त मला देण्यात आले. खरं म्हणजे मी फक्त अमित ठाकरे यांचा थोडा अपराधी आहे. मी अमित ठाकरेंना छत्रपती संभाजीनगरच्या सभेत हे शब्द दिला होता, अमितजी मी तुमच्यासोबत आणि तुमच्या मुलासोबत देखील काम करेल. पण दुर्दैवाने परिस्थिती अशी आली. मी दिलेला शब्द पाळू शकत नाही. अमितजी तुम्ही मला समजून घ्याल असं वाटतंय. कधी कधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्य ते त्याला मिळत नाही. हा नशिबाचा मी एक भाग समजतो. असंख्य मनसैनिकांनी माझ्यावरती मनापासून प्रेम केलं. वेळोवेळी ते सर्वर्थाने माझ्यासाठी धावून आले. त्या सर्व मनसैनिकांचा मी कायमचा ऋणी राहील. पण मला असं वाटतं की आता आपण थांबलं पाहिजे. कुठेतरी या मनोरुग्न अवस्थेतून बाहेर आले पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

प्रकाश

मंत्री गिरीश महाजनांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; माधवी जाधव यांना प्रकाश...

0
नाशिक | Nashikमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंत्री महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव...