संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची घोषणा मावळते क्रीडामंत्री डॉ.गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली. तीन वर्षाचे क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आले आहे. संगमनेर येथील बाल शिक्षण मंडळाचे श्री.दिगंबर गणेश सराफ विद्यालयाची माजी व सध्या सारडा महाविद्यालयाची खेळाडू कुमारी प्रणिता सोमण हीस सन २०१९-२० चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सायकलिंग मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जाहीर करण्यात आला.
प्रणिता सोमण ही सराफ विद्यालयाची दहावी पर्यंतची सायकलिंग खेळाडू होती.विद्यालय दशेत सायकलिंग बरोबरच तिने बुद्धिबळ,नेटबॉल,ट्ग-ऑफ-वॉर या खेळ प्रकारातही राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली होती.पुढील शिक्षणासाठी तिने अहमदनगर येथील सारडा महाविद्यालयात प्रवेश घेऊन प्रा.संजय साठे व प्रा.संजय धोपावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय व एशियन गेम पर्यंत मजल मारत महाराष्ट्र संघाला अनेक पदक मिळवून दिले.
प्रणिताचे वडील बाल शिक्षण मंडळाचे खजिनदार डॉ.प्रफुल्ल सोमण यांनाही सायकलींची आवड असून प्रणिताच्या यशामागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा आहे.प्रणिताला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर श्री. दि.ग.सराफ विद्यालय व डॉ.दे.अ.ओहरा कॉलेजमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडून आनंद व जल्लोष व्यक्त करण्यात आला.
प्रणिताला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बाल शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड.अरविंदराव गणपुले,उपाध्यक्ष डॉ.अरविंदराव रसाळ,कार्याध्यक्ष डॉ.मुकुंद गाडगीळ, चिटणीस सौ.नीला जोशी, प्रशासक डॉ.आशुतोष माळी, खजिनदार डॉ.प्रफुल्ल सोमण विद्यालय व कॉलेजचे प्राचार्य कारभारी वाकचौरे, उपप्राचार्य मधुकर कुळधरण, पर्यवेक्षक द्वारकानाथ जाधव,कॉलेज इन्चार्ज प्रा.संजय गुंजाळ, क्रीडा शिक्षक प्रा.सुनिल मंडलिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.