श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
जळगाव येथून बदलून आलेले किरण अरुण सावंत पाटील यांनी नुकताच श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. येथील कार्यरत प्रांताधिकारी अनिल पवार यांची पुणे येथील सारथी या संस्थेत उपव्यवस्थापकीय संचालक पदावर बदली झाली आहे.
त्यांच्या जागी जळगाव येथून विशेष भुसंपादन अधिकारी पदावरून बदलून आलेले किरण सावंत यांची श्रीरामपूरचे नवे प्रांताधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.त्यांनी 2009 ते 2015 या काळात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात तर 2015 ते 2019 या काळात नगर जिल्ह्यातील कर्जत येथे तहसीलदार पदावर काम केले आहे.
तसेच 2019 मध्ये त्यांची जळगाव येथे उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीने विशेष भुसंपादन अधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. कृषी निष्णात पदवी संपादन केलेले श्री. सावंत हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील दहेगाव येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत.