कोल्हापूर | Kolhapur
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा अपमान करणाऱ्या तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.
- Advertisement -
प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) तेलंगणातून अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात (Kolhapur Session Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर १० दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली होती.
दरम्यान, ३० मार्च रोजी कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. यानंतर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला सशर्त जामीन (Bail) मंजूर केला आहे.