Sunday, April 27, 2025
Homeधुळेधुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रतिभा चौधरी

धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रतिभा चौधरी

धुळे dhule । प्रतिनिधी

धुळे महानगरपालिकेच्या (Dhule Municipal Corporation) महापौरपदी (Mayor) भाजपाच्या प्रतिभा शिवाजीराव चौधरी तर स्थायी समिती सभापतीपदी (Standing Committee Chairman) किरण राकेश कुलेवार आणि महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी (Chairperson of Mahila Child Welfare Committee) सारिका प्रवीण अग्रवाल, उपसभापतीपदी विमलबाई गोपीचंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत औपचारीक घोषणा 8 फेब्रुवारी रोजी होणार्‍या महासभेत होईल.

- Advertisement -

महापौर, स्थायी सभापती, महिला बालकल्याण समिती सभापती आणि उपसभापती निवडीसाठी प्रक्रिया सुरु असून आज या पदांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची मुदत होती. या मुदतीत प्रत्येक पदासाठी एकानेच नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. एकाही विरोधकाने नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही.

नामनिर्देनपत्र दाखल करतांना खा.डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, ओमप्रकाश अग्रवाल, विनोद मोराणकर, चंद्रकांत गुजराथी, कशीश उदासी, अल्पा अग्रवाल, वंदना थोरात, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, वालिबेन मंडोरे, मोहिनी गरुड, भारती माळी, संजय जाधव, बन्सीलाल जाधव, शशी मोगलाईकर, डॉ.महेश घुगरी, संजय बोरसे, हेमंत मराठे, नंदु सोनार, राकेश कुलेवार, महादेव परदेशी, यशवंत येवलेकर, बबन चौधरी, प्रवीण अग्रवाल, राजू मराठे, गोपीचंद पाटील आदी उपस्थित होते.

गटबाजी रोखण्यासाठी भाजपची सहल-

सत्ताधारी भाजपात एकेका पदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने गटबाजी होण्याची भिती होती. त्यामुळे भाजप नेत्यांनी नगरसेवकांना लोणावळा येथे कालपासून सहलीवर नेले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करावयाचा असल्याने काही नगरसेवक धुळ्यात दाखल झाले. तर उर्वरित नगरसेवक लोणावळ्यातच आहेत. खा.डॉ.सुभाष भामरे, आ. जयकुमार रावल व महानगर प्रमुख अनुप अग्रवाल हे देखील लक्ष ठेवून आहेत.

बुधवारी विशेष सभा

महापौर, स्थायी समिती सभापती तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती निवडीसाठी दि.8 रोजी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. या सभेत सकाळी 11 वाजता महापौर तर दुपारी 3 वाजता सभापतींच्या निवडीची औपचारीक घोषणा केली जाणार आहे.

आज बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...