Tuesday, September 29, 2026
Homeनगरवाळूतस्करांचा आश्वीतील प्रवरा नदीपात्रात हैदोस

वाळूतस्करांचा आश्वीतील प्रवरा नदीपात्रात हैदोस

रात्रीच्या वेळी जेसीबीने केला उपसा

आश्वी |वार्ताहर| Ashwi

महसूल व पोलीस प्रशासन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त असताना संगमनेर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये नदीपात्रातून वाळू उपशासाठी वाळूतस्करांची स्पर्धा सुरु आहे. वाळूतस्करांनी नदीपात्रात मोठा धुमाकूळ घातला आहे. आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्दला जोडणार्‍या प्रवरा नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा असून पूर्व दिशेला हाकेच्या अंतरावर वाळूतस्करांनी अवैधरित्या जेसीबीच्या साहाय्याने उत्खनन करत मोठमोठे वाळूचे डेपो केले आहे.

- Advertisement -

स्थानिक पुढारी व शासकीय कर्मचार्‍यांशी संगनमताने अव्वाच्या सव्वा किंमतीत चोरुन वाळू पुरवठा करुन लोकांची हे वाळूतस्कर लूट करत आहे. या तस्करांमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याने स्थानिक नागरिक वाळूतस्करांवर व स्थानिक अधिकार्‍यांवर नाराज आहेत. वाळूतस्करीतून पैसा, पैशातून राजकारण व दादागिरी करणार्‍या मोठ्या वाळूतस्करांवर कारवाई कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

संगमनेरच्या महसूल प्रशासनाने प्रवरा नदीपात्रालगत असलेल्या या गावांमध्ये गस्त वाढवून वाळूतस्कंराच्या मुसक्या आवळणे गरजेचे असल्याची मागणी स्थानिक नागरिकांतून जोर धरु लागली आहे. तर नदी पात्रालगतचे शेतकरी या वाळूतस्करांना रस्ते उपलब्ध करुन देत त्या बदल्यात मोठ्या प्रमाणात पैसे घेतात असे रस्ते महसूल विभागाने बंद केल्यास वाळूतस्करीला आळा बसेल, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...