Tuesday, May 21, 2024
Homeनगरप्रवरानदी पात्रातून चोरून वाळू वाहतूक करीत असलेला डंपर पकडला

प्रवरानदी पात्रातून चोरून वाळू वाहतूक करीत असलेला डंपर पकडला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून बेकायदेशीर अवैधरित्या शासनाच्या मालकीची वाळू चोरून वाहतूक करताना श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षक यांच्या पथकाने विना क्रमांकाचा तीन ब्रास वाळू व डंपर ताब्यात घेऊन चालकाला जेरबंद केले आहे. तर डंपर मालक दीपक बबन लाटे हा पसार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडून समजले आहे.

- Advertisement -

24 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान प्रवरानदी पात्रातून बेकायदेशीर रित्या शासनाच्या मालकीची डंपरमध्ये तीन ब्रास वाळू वाहतूक करत असताना पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने देवळाली प्रवरा कारखाना जाणार्‍या रोडने होले वस्ती परिसरात सदर डंपर पकडला. याबाबत पोलीस हवालदार सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या फिर्यादीवरून सतीश रावसाहेब कुदनर (वय 32) रा. पिंपळगाव फुणगी ता. राहुरी. तसेच दीपक बबन लाटे, रा. चिंचोली ता. राहुरी या दोघांवर भादंवि कलम 379, 34 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या