Sunday, April 27, 2025
Homeनगरतोल गेल्याने तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

तोल गेल्याने तरुणाचा प्रवरा नदीपात्रात बुडून मृत्यू

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

शहराजवळून वाहणार्‍या प्रवरा नदीपात्रात (Pravara River) बुडून तरुणाचा मृत्यू (Youth Drowning Death) झाल्याची घटना रविवारी (दि.19 मे) दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द (Sangamner) परिसरातील मोठ्या पुलाजवळ घडली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की गौतम उर्फ शाहरुख दगडू यरमल (वय 35, रा. संगमनेर खुर्द) हा तरुण छोट्या पुलावरून संगमनेर खुर्दकडे घरी जात असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो प्रवरा नदीच्या वाहत्या पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू (Drowning Death) झाला.

- Advertisement -

सध्या नदीला शेतीचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. दरम्यान, मोठ्या पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात वाहून चालला असल्याचे नदीत पोहणार्‍या तरुणांच्या निदर्शनास आले. ही माहिती संगमनेर शहर पोलिसांना देण्यात आली. तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण भान्सी, उपनिरीक्षक सुनील माळी, पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार, वाहन चालक मोरे हे प्रवरा नदीच्या मोठ्या पुलावर आले. त्यावेळी सदर तरुणाचा मृतदेह प्रवरा नदीच्या (Pravara River) छोट्या पुलावरून मोठ्या पुलापर्यंत वाहत आल्याची माहिती पोहणार्‍या तरुणांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत त्या तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : आज डबल हेडर; ‘हे’ संघ भिडणार, उपांत्य फेरी...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) दोन सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ...