Friday, April 25, 2025
Homeनगरप्रवरा उजव्या कालव्याच्या चारीत पडून सायकलस्वाराचा मृत्यू

प्रवरा उजव्या कालव्याच्या चारीत पडून सायकलस्वाराचा मृत्यू

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील चणेगाव शिवारात शनिवारी (दि.28) सकाळी प्रवरा उजव्या कालव्यातील (Pravra Canal) चारीत सायकलसह एक मृतदेह (Dead Body) पडलेला आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत आश्वी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की चणेगाव शिवारातून प्रवरा उजवा कालवा जातो. याठिकाणी असलेल्या चारीत शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास एक व्यक्ती सायकलसह पालथा पडलेला दिसला. त्यामुळे ही बातमी वार्‍यासारखी परिसरात पसरली असता बाबासाहेब सोनवणे यांनी तत्काळ आश्वी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केल्यानंतर मृतदेह (Dead Body) पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिला.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मृत पावलेली व्यक्ती ही राहुरी (Rahuri) तालुक्यातील निभेंरे (Nimbhere) येथील रहिवासी असून नाव रमेश बन्सी सोनवणे (वय 52) असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान मयत रमेश सोनवणे यांच्या घरची परिस्थिती जेमतेम असल्याने मोलमजुरी करून ते कुटुबांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली व जावई असा मोठा परिवार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...