Sunday, May 4, 2025
Homeधुळेजगात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना

जगात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना

धुळे । dhule प्रतिनिधी

नाताळ सणानिमित्त (Christmas festival)आज जगात शांतता नांदावी (Peace in the world) यासाठी चर्चमध्ये (church) सामुहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच केक कापून येशु ख्रिस्तांचा जन्मदिवस (Birthday of Jesus Christ) साजरा करण्यात आला.

- Advertisement -

गेल्या 15 दिवसांपासून नाताळ सणाची तयारी सुरु होती. चर्चला रंगरंगोटी करुन आकर्षक सजविण्यात आले होते. चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी जगात शांतता नांदावी यासाठी चर्चमध्ये सामुहिक प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर येशु ख्रिस्तांचा केक कापून जन्मदिवस साजरा करण्यात आला. ख्रिस्त बांधवांनी नाताळच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नाताळनिमित्त 31 डिसेंबर पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाताळनिमित्त शहरातील चर्चमध्ये सुशोभित करुन देखावे सादर करण्यात आले. सेंट अ‍ॅन्थोनी चर्चमध्ये झालेल्या विशेष कार्यक्रमात सर्वधर्मीय मान्यवरांनी उपस्थित राहून नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या. देवपूरातील जयहिंद महाविद्यालयानजीक असलेल्या चर्चमध्ये तसेच मोगलाईतील चर्चमध्ये नाताळनिमित्त सुशोभित करण्यात आले आहे. विद्युत रोषणाईने परिसर झगमगत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Jammu and Kashmir : भारतीय सैन्याचा ट्रक ७०० फूट खोल दरीत...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) रामबन जिल्ह्यातील (Ramban District) जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सैनिकांची गाडी रस्त्यावरून घसरून अपघात (Accident) झाल्याची...