Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजजिल्ह्यात तालुकास्तरावर विवाह पूर्व संवाद केंद्र होणार स्थापन- जिल्हाधिकारी

जिल्ह्यात तालुकास्तरावर विवाह पूर्व संवाद केंद्र होणार स्थापन- जिल्हाधिकारी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक येथील विवाह पूर्व संवाद केंद्राच्या माध्यमातून नियोजित वधु-वरांचे समुपदेशन होणार असून,विचार व मतांच्या आदान-प्रदानातून कौटूंबीक नाती अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त करीत येणार्‍या काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विवाहपूर्व संवाद केंद्र स्थापन होणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.

- Advertisement -

जागतिक महिना दिनी राष्ट्रीय महिला आयोग यांच्या उपक्रमातून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर येथे ‘तेरे मेरे सपने’ विवाह पूर्व संवाद केंद्र नाशिकच्या उद्घाटन कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते.

यावेळी महिला व बाल विकास नाशिकचे विभागीय उप आयुक्त चंद्रशेखर पगारे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हा समन्वयक कविता जुनेजा, विवाह ठरलेली जोडपी यांच्यासह अधिकारी व महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांंनी राष्ट्रीय महिला आयोगांच्यामार्फत देशात ९ राज्यात २२ ठिकाणी विवाह पूर्व संवाद केंद्र आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सूरू करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात विवाह पूर्व संवाद केंद्र सुरू होणे ही जिल्हा प्रशासनासाठी अभिमानास्पद बाब आहे जिल्हा प्रशासनामार्फत याच धर्तीवर तालुकास्तरावर असे विवाह पूर्व संवाद केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू आहे.

या केंद्रात येणारे नियोजित वधु- वरांना समुपदेशन करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत समुपदेशकांना दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात आले आहे. या केद्रांत येणार्‍या जोडप्यांना त्यांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, न्यायिक अधिकार, विवाहनंतरचे आर्थिक नियोजन याबाबत मार्गदर्शन केले जाणार असून, त्यांच्या एकामेकांबद्दलच्या अपेक्षाही येथे जाणून घेतल्या जाणार आहेत.

तसेच ‘तेरे मेरे सपने’ विवाह पूर्व संवाद केंद्रातून राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दुसाणे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. महिला व बाल विकास नाशिकचे विभागीय उप आयुक्त पगारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी महिला बाल विकास भवन ज्यात सर्व महिला व बाल विकास कार्यालये एका छताखाली असणार्‍या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या मार्फत इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग सुभाष लांडगे यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते इ-सायकल च्या चावीचे प्रदान करण्यात आले.

देशात एकूण २२ विवाह पुर्व संवाद केंद्र
देशातील २२ विवाह पुर्व संवाद केंद्रात हरियाना, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राज्यस्थान, ओरीसा, मध्यप्रदेश, केरळ, नवी दिल्ली व गुजरात हे राज्य आहेत. त्यात महाराष्ट्रातील गोरेगाव, बोरिवली, कांदिवली, जालना, नाशिक, लातुर, छत्रपती संभाजीनगर, सांगोला, सोलापुर व नागपुर या १० ठिकाणांचा समावेश आहे

शहरासोबतच ग्रामीण भागातील कुटुंबांनाही या विवाह पूर्व संवाद केंद्राचा लाभ घेता येणार आहे. याबाबत ग्रामीण व आदिवासी भागातही याबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार असून ऑनलाईन सुविधेद्वारे ही समुदेशन करण्याची सुविधा नाशिक केद्रात उपलब्ध आहे.- जिल्हाधिकारी जलज शर्मा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...