Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक जिल्ह्यात उद्यापासून 'विवाह पूर्व समुपदेशन केंद्र' कार्यान्वित होणार

नाशिक जिल्ह्यात उद्यापासून ‘विवाह पूर्व समुपदेशन केंद्र’ कार्यान्वित होणार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या उपक्रमातून जिल्ह्यात 8 मार्च 2025 रोजी ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) सखी वन स्टॉप सेंटर, शासकीय मुलींचे अनुरक्षण गृह आवार, नासर्डी पुलाजवळ, नाशिक पुणे रोड येथे सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

- Advertisement -

प्रभावी संवाद आणि भावना विकसित करणे, सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षा समजून घेणे व परिवारात सामंजस्य आणि आदर भाव राखणे हाच ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) चा आहे. विवाहाच्या अल्‍प कालावधीत वाढत जाणारे कौटुंबिक वाद, त्यामुळे होणारे घटस्फोट टाळण्यासाठी विवाहानंतर उद्भवणाऱ्या विविध शारीरिक मानसिक कौटुंबिक समस्यांबाबत माहिती व्हावी, तसेच परस्परांबाबत माहिती होणे, परस्परांच्या नोकरीचे स्वरूप व त्यामुळे होणारे संभाव्य ताणतणाव इत्यादी बाबतची पूर्वकल्पना आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे व्यवस्थापन याबाबत पूर्व वधू वरांना या संवाद केंद्राच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रतिबंधनात्मक खबरदारी घेणे, कौटुंबिक न्यायालये, पोलीस विभाग, कौटुंबिक सल्ला केंद्रातील प्रकरणांची संख्या कमी करणे, कुटुंबात आनंदी वातावरण राहवे आणि सामंजस्य रहावे यासाठी विवाहपूर्व संवाद होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात ‘तेरे मेरे सपने’ (विवाह पूर्व संवाद केंद्र) कार्यान्वित करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत समुपदेशकांना दिल्ली येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यामातून प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी दुसाणे यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...