Saturday, July 27, 2024
Homeशब्दगंधअक्साई चीनमध्ये २०४७ ची पूर्वतयारी

अक्साई चीनमध्ये २०४७ ची पूर्वतयारी

– कर्नल अभय पटवर्धन

अक्साई चीनमध्ये झपाट्याने सुरू असलेली बांधकामे आणि अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे हे दर्शवणारे नकाशे यावरून चीनला चिघळलेल्या सैनिकी सीमावादावर तोडगा काढण्याची किंवा सोडवण्याची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे अक्साई चीनमध्ये सुरू झालेले बांधकाम हळूहळू तिबेट आणि हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत तर जाणार नाही ना, ही भारतीय संरक्षणतज्ज्ञांची भीती निःसंशयपणे रास्त आहे असे म्हणता येईल.

- Advertisement -

उपग्रहाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेले अक्साई चीनमधल्या एका साईटचे काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजताहेत. विरोधी पक्ष आणि सरकार विरोधक टीकाकारांच्या हाती हे आयते कोलीत लागले आहे. उपग्रह फोटोंमधील साईट ही ‘अक्साई चीन’ या 1953-54 पासून चीनच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात आहे. ही साईट लडाखमध्ये 1962 पासून प्रचलित व अंमलात असलेल्या लाईन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोलच्या (एलएसी) पूर्वेला असणार्‍या, अक्साई चीनमधून भारतात येणार्‍या एका नदीभोवतालच्या पहाडात आहे. अक्साई चीन हा आमचाच आहे आणि चीनने यावर अवैध कब्जा केलेला आहे, हे भारत जगाला व पर्यायाने चीनला 1957 पासून सांगतो आहे.

लडाखमधील देस्पांग क्षेत्राच्या 60 किलोमीटर पूर्वेला असलेल्या या साईटवर नदीच्या दोन्ही किनार्‍यावरील पहाडांना फोडून, प्रचंड मोठ्या प्रमाणात सिमेंटचे बंकर्स आणि बोगदे बांधले जात आहेत, हे या उपग्रहीय फोटोंच्या विश्लेषणातून स्पष्ट होते. मागील तीन-चार महिन्यांमधील उपग्रहीय फोटोंची तुलना केली असता पहाडांमध्ये खोदलेल्या 11 बंकर्स आणि सहा शेल्टर्सच्या छाया स्पष्ट ओळखता येतात. काही फोटो सिमेंट मिक्सर्ससारख्या अवजड यंत्रांच्या, वेगवेगळ्या ठिकाणच्या सावल्याही दर्शवतात. अशा प्रकारचे बांधकाम भारताचे एयर स्ट्राईक्स किंवा दूर पल्ल्याच्या हेवी आर्टिलरी गन्सच्या मार्‍यापासून चिनी सैनिक आणि अवजड हत्यारांच्या संरक्षणासाठी केले गेले आहे यात शंकाच नाही.

अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे चीनचाच हिस्सा आहे हे दाखवणारे नवे नकाशे चीनने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केले होते, पण भारतीय परराष्ट्रखात्याने ते नकाशे तत्काळ फेटाळून लावले. 1954 पासून चीन हेच करत आला आहे. प्रत्येक वेळी भारतात काही महत्त्वाची घटना घडणार असेल तेव्हा चीन अशाच आगळीकी करतोे. यावेळी सप्टेंबर महिन्यात होणार्‍या जी-20 बैठकीच्या अनुषंगाने चीनने ही कार्यवाही केली आहे. पण असे केल्याने जमिनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती बदलत नाही. केवळ असे विचित्र दावे केल्यामुळे दुसर्‍यांची जमीन आपली होत नाही. आमची जमीन कोणती आहे हे आम्हाला नीट ठाऊक आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला खडसावले आहे. रशियन राष्ट्रपतींनी भारतीय वक्तव्याचे समर्थन केले. संरक्षणतज्ज्ञ आणि विश्लेषकांनुसार, अक्साई चीनमधल्या कारवायांमधून चीनची सामरिक व डावपेचात्मक हतबलता उजागर होते.

चीनच्या तुलनेत भारतीय वायुसेनेकडे जास्त मारक क्षमता आणि ताकद असल्याने चीनला ही हतबलता आली आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. हा सर्व परिसर भारतीय वायुसेना आणि हेवी आर्टिलरीच्या अचूक मार्‍याच्या टप्प्यात येत असल्यामुळे चीनने एलएसीच्या इतक्या जवळ पहाडांच्या आतमध्ये बांधकाम करून त्याद्वारे भारताच्या वरचष्म्याला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. लडाखमधल्या गलवान येथील 2020 मधील चकमकीनंतर भारताने या क्षेत्रातील एअर, आर्टिलरी, मिसाईल आणि रॉकेटरीच्या आक्रमक फायर पॉवरमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्धी केली आहे. या आक्रमकतेने चीनला बिळात जायला भाग पाडले आहे.

जर चीनने तैवानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर क्वाड संघटनेचा सदस्य म्हणून भारताला चीनच्या दक्षिण सीमेचे उल्लंघन करावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनलाही याची कल्पना असल्यामुळे तो त्या आक्रमणाच्या संभाव्य मार्गावर भारतीय सेनेला हानी पोहोचवण्याची तयारी अक्साई चीनमध्ये करतो आहे. याउलट चीनला भारतावर आक्रमण करायचे असेल तर ते याच मार्गाने होण्याची शक्यता असल्यामुळे भारतीय सैन्याच्या हल्ल्यांपासून रक्षणासाठी चीन ही तयारी करतो आहे, हेदेखील स्पष्ट होत आहे.

या दोन्ही पर्यायांमध्ये युद्ध सर्वंकषच होईल. असे रिएन्फोर्सड बंकर्स तयार केल्यामुळे फारशी हानी न होता चीनला अधिक काळ युद्धात टिकून राहणे सहज शक्य होईल. 1962 आणि 2020 मध्ये चीनचे सैनिक याच मार्गांनी पूर्व लडाखमध्ये आले होते हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

चीन या क्षेत्रात झपाट्याने पक्की बांधकामे करत आहे. या बंकर्स आणि शेल्टर्सची रचना बॉम्बचा प्रेशर इम्पॅक्ट कमी करण्यासाठी केली गेली आहे. यासाठी त्यांच्या आजूबाजूला बॉम्ब मार्‍याचा प्रभाव कमी करण्यासाठी मातीचे ढीग टाकलेले दिसतात. खोर्‍यात असलेला एकच रस्ता जवळपास 12 ते 15 फूट रुंद करण्यात आला असून पक्का झालेला दिसतो.

2020-21 मधील उपग्रहीय फोटोंमध्ये अक्साई चीनमधल्या वर उल्लेखित नदीखोर्‍यात फारच कमी बांधकाम दिसले होते, पण ताज्या फोटोंमध्ये तेथील परिस्थिती खूप मोठ्या प्रमाणावर बदललेली दिसून येते. एकीकडे आम्हाला भारत-चीन सीमेवरील ताण लवकरात लवकर कमी करायचा आहे, असे चिनी राष्ट्रपती शि जिनपिंग म्हणतात; चिनी पंतप्रधान ली क्वांग चिनी राष्ट्रपतींच्या वक्तव्याला दुजोरा देतात. पूर्व लडाखमध्ये ऑफिशियल ‘नो पेट्रोल झोन’ स्थापन करण्यात येतील, अशी समन्वयी घोषणा दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैनिकी अधिकार्‍यांमध्ये झालेल्या 19 व्या शिखर बैठकीत करण्यात येते. पण तिसरीकडे अक्साई चीनमधल्या, भारताकडे येणार्‍या नदीवरील सामरिक बांधकामाचे उपग्रहीय फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. यातून फक्त एकच गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ‘चायना इज डिगिंग फॉर ए लाँग हॉल’. यापुढे चीन भारताच्या कुठल्याही आक्षेपांना न जुमानता किंवा दोन्ही देशांमधील संबंधांची पर्वा न करता आक्रमक सीमावादाची कास धरेल. घसरत चाललेली अर्थव्यवस्था, तैवान, दक्षिण चीन समुद्रप्रश्नावरून अमेरिका व नाटो संघटनेशी होऊ घातलेल्या युद्धाची अपरिहार्यता आणि वेस्टर्न पॅसिफिकमधील समुद्री मार्गाचा ज्वलंत प्रश्न यांची तीव्रता त्याला असले भारतविरोधी पाऊल उचलण्यापासून रोखणार नाही. यापुढे पीएलए नेहमीच खूप मोठ्या संख्येत सीमेवर तैनात राहील आणि भारतालाही तेच करण्यास भा

- Advertisment -

ताज्या बातम्या