Monday, November 25, 2024
Homeब्लॉगBlog : निसर्गाकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

Blog : निसर्गाकडून मिळणारे पावसाचे पूर्वसंकेत

आज माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात पटकन गूगल सर्च करून आपण हवामान अंदाज बघतो. परंतु कधी-कधी हा अंदाज सुद्धा चुकतो, आज माणसाने या क्षेत्रात फार प्रगती केली म्हणूनच ही बाब सहज शक्य होते. निसर्गात सुद्धा वनस्पती, प्राणी, पक्षी यांना भविष्यातील धोके ओळखण्याचे कौशल्य जन्मजात विकसित असतात. ग्रामीण भागात पूर्वी शेतकरी आपल्या परिसरातील वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक यांच्या निरीक्षणातून पावसाचा अंदाज अचूक बांधत असे…

जंगलातील जुन्या व मोठया वृक्षांना अवर्षणाचे संकेत मिळाले तर ते त्यांच्या खोडांमध्ये जास्त पाणी साठवून ठेवतात, कडुनिंबाला जास्त निंबोळ्या लागल्या की कमी पाऊस पडतो. खैर, शमी यांना जास्त फुलोरा लागल्यास त्या वर्षी कमी पाऊस होतो, बहावा चांगला फुलला की त्या वर्षी चांगला पाऊस होतो. बिब्याला चांगली फुले लागली की त्या भागात दुष्काळ पडतो. हे झाले वनस्पतींद्वारे मिळणारे संकेत.

- Advertisement -

याचप्रमाणे पक्ष्यांद्वारेदेखील आपल्याला पावसाचे संकेत मिळतात. जसे, चातक पक्ष्याचे आगमन झाले की, समजायचे पहिल्या पावसाच्या सरी लवकरच येणार, अगदी त्याच्या अगमनाहून पाऊस लवकर पडणार की उशिरा याचा अंदाज बांधता येतो.

पावशा या पक्ष्यांचा आवाज येऊ लागला की, शेत मशागतीला सुरुवात करायची असा संकेत मिळतो. मे महिन्यात कावळ्याने जर बाभळी, सावर आशा काटेरी झाडांवर घरटी केली की समजायचे त्या वर्षी पाऊस कमी होणार आहे.

जर आंबा, फणस सारख्या वृक्षांवर घरटी केली की समजायचे जास्त पाऊस होणार आहे. समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या खेकड्यांवरून पण पावसाचा अंदाज येतो. कित्येक निसर्ग अभ्यासकांनी पशुपक्ष्यांचा अभ्यास करून ही माहिती मिळवली आहे. मारुती चितमपल्ली यांच्या निसर्ग लेखनात आपल्याला असा अनेक गमती-जमती अनुभवता येतील. निसर्गाचा हा चमत्कार जर आपल्याला देखील अनुभवायचा असेल तर आपण ही निसर्गासोबत जवळीक साधली पाहिजे.

– पूजा कोठुळे (Field Officer)

नेचर कॉन्सरवेशन सोसायटी ऑफ नाशिक

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या