Saturday, July 27, 2024
Homeनाशिकनामको’ च्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नामको’ च्या निवडणुकीचा बिगुल वाजला

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील सभासद व व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि. अर्थात नामको बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची तयारी सुरु झाल्याने, गटागटाच्या जोडबांधणीला गती आली आहे. बँकेच्या २१ जागांसाठी दि. २४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, दि. २५ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

- Advertisement -

नामकोची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांच्या भेटीगाठींसह नवनवीन रणनितीच्या कामाला वेग येउ लागला आहे. बँकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. २४) सकाळी १० वाजता बँकेचे प्रशासकीय कार्यालय सातपूर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यावेळी अधिकृत निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल.

शहर व जिल्ह्यातील व्यापारी बँक म्हणून नामको बँकेचा लौकिक आहे. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक ही चुरशीची होत असल्याने या निवडणुकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांसमोर कोणकोणते पॅनल येतात याकडे विशेष लक्ष लागलेले आहे.

प्रत्यक्षात नामको बँकेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत करता येणार आहे. प्राप्त नामनिर्देशन २१ जागांसाठी २४ डिसेंबरला मतदान पत्रांची यादी २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्रसिद्ध करण्यात येईल. प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात येणार आहे. वैध नामनिर्देश न पत्रांची यादी ५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ६ ते ११ डिसेंबर अशी आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १२ डिसेंबर रोजी चिन्ह वाटप व चिन्हासह अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. दि.२५ डिसेंबर रोजी सकाळी ८वाजेपासून मतमोजणी करण्यात येणार आहे. मतदानाचे स्थळ व मतमोजणीचे स्थळ आवश्यकता भासल्यास स्वतंत्र रीत्या जाहीर करण्यात येणार आहे.

प्रशासकीय कार्याकाळानंतरच्या कामांची शिदोरी

प्रशासकाच्या नेमणूकीमुळे नामको बँकेची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ती सुधारण्यासोबतच बँकेला स्थिरस्तावर करण्याचे मोठे आव्हान त्यावेळी सत्तारुढ पक्षावर होते.त्यातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करुन विद्यमान पदाधिकार्‍यांनी सभासदांची विश्वासार्हता मिळवळ्याची चर्चा आहे.

अशा आहेत २१ जागा

अनुसूचित जाती जमातीकरिता -१जागा

महिलांसाठी-२ जागा

सर्वसाधारण गटासाठी-१८ जागा,

एकूण- २१

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या