Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्याकुंभमेळ्याच्या तयारीचे मनपाला लागले वेध

कुंभमेळ्याच्या तयारीचे मनपाला लागले वेध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

देशभरातील भाविकांच्या आस्थेचे केंद्र राहीलेल्या सिंहस्थ कुभमळा (Simhastha Kubhamla) स्नानासाठी देशभरातून लाखो भाविक शहरात येत असतात.

पर्वणी स्नानासाींतर दहा ते 15 लाख भाविक गर्दी करीत असतात. शहरात दाळकहोणार्‍या या गर्दीच्या दृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी विविद विकास कामांना (Development works) गती देण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे नियोजन केले जात आहे. यासाठी लागणार्‍या निधी (fund) उपलब्ध होर्‍यासाठी मनपाद्वारे शिखर समिती गठण करण्याची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.

नाशिक (nashik) व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथ 2026-27 या कालावधीत सिंहस्थ कुंभमेळा (Simhastha Kubhamla) भरणार आहे. या निमित्ताने लाखो भाविक हे शहरात दाखल होत असतात. त्यामुळे शहराती सर्व सेवांवर त्याचा अतिरिक्त भार पडत असतो. या पार्श्वभूमीवर शहरात येणार्‍या वाहनांच्या गर्दीच्या नियोजनासोबतच त्यांना लागणार्‍या प्राथमिक सविधा, शहराला जोडले जाणारे मार्ग अश्या अनेक गोष्टींच्या विकासासाठी विविध समित्यांचा गठन करण्यात येत असते.

सिंहस्थासाठी राज्य शासनाच्या (State Govt) माध्यमातून शिखर समितीगठीत केली जाते. त्यासोबतच जिल्हाधिकार्‍यांच्या स्तरावर जिल्हाधिकारी समिती व स्थानिक समिती अशा विविध समित्यांचे गठन केले जात असते. राज्यस्तरावरील शिखर समितीची स्थापना झाल्यानंंतरच खर्‍या अर्थाने सिंहस्थासाठीच्या विकास कामांबाबतचे नियोजन सुरू होत असतें. कुंभमेळ्यासाठी जुन 2023 पूर्वी विकास कामांच्या आराखड्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे.

1 जानेवारी 2024 पासून प्रत्यक्ष विकास कामाना गती देणे गरजेचे आहे. दोन वर्षाच्या काळात म्हणजेच 2024 ते 2026 यादरम्यान नियोजनबद्ध विकास कामांना गती देता येणार आहे. शहराच्या वाहतूकीवर भार पडू नये गर्दीवर यिंत्रण ठेवता यावे यासाठी शहराच्या अंतर्गत रिंगरोड (Ring Road) व बाह्य रिंगरोड उभारण्याचा प्रस्ताव आहे. अंतर्गत रिग रोडमुळे शहरात दाखल झालेल्या गर्दीचे नियोजन करणे तर बाह्य रिंगरोडमुळे शहरातील गर्दीत न अडकता शहराच्या बाहेरुन मार्गस्थ होण्यासाठीचा सूलभ मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव आहे.

यासोबतच संतमहंताचे वास्तव्य असणार्‍या तपोवनातील साधूग्रामसाठीच्या जागेचे अधिग्रहण (Acquisition of land) आहे. शहरांतर्गत रिंगरोडसाठी लागणार्‍या जागेचे हस्तांतरण आदींसह प्राथमिक सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे. सिंहस्थसाठी कोटींची मागणी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामसह विविध अधिग्रहणाच्या कामांसाठी लागणारा 4599 कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करुन देण्याची मागणी महानगर पालिकेने राज्य शासनाकडे केली आहे.

मनपा हद्दीतील भूमी अधिग्रहणाचे सुमारे 171 प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यासह विविध जागा, रस्त्यासाठीच्या भूखंडांचे अधिग्रहण, रिंगरोडचा विकास कामांसाठी 4 हजार 599 कोटी रुपयांची आवश्यकता असलयाचे समोर आले आहे. मनपाच्या माद्यमातून आहे. मनपाच्या क्षमतेचा विचार केल्यास मनपाचा बजेटही तेवढा मोठा नसल्याने मनपाच्या माद्यमातून 150 ते 175 कोटी रुपये उभे करणे शक्य होते.मात्र एवढ्या मोठ्या रकमेची तजविज करणे मनपाला अशक्य असल्याने राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेला एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने यासाठी मनपाने राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त महसूल उपलब्ध झाल्यात तातडीने विकास कामांचे नियोजन करणे शक्य होणार असल्याने त्यासाठी शिखर समितीचे गठण गरजेचे आहे.

– डॉ.चंद्रकांत पूलकुंडवार, मनपा आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या