नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्पाईस जेटकडून (Spice Jet) नाशिकहून गोवा, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, जयपुर, दिल्ली आणि अन्य महत्वाच्या शहरांसाठी लवकरच विमानसेवा (Airlines) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तर इंडिगोची (Indigo) नागपूर विमान सेवा आता हैदराबादपर्यंत हॉपिंग करण्याची तयारी झालेली आहे. त्यामुळे नाशिक (Nashik) शहर आता हवाई मार्गाने इतर शहरांशी जोडले जाणार आहे.
अरविंद केजरीवाल, भगवंत मान घेणार उद्धव ठाकरेंची भेट; काय आहे कारण?
इंडिगोची 15 मार्चपासून सुरू होणारी नाशिक- नागपूर विमान सेवा (Nashik-Nagpur Airline Service) हॉपिंग असणार आहे. त्यामुळे आता नाशिककरांना हैदराबादशी (Hyderabad) आणखी एका विमान सेवेने जोडणी होणार आहे.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावल्या
सध्या ओझर विमानतळावरून (Ozar Airport) स्पाईस जेटच्या दिल्ली आणि हैदराबाद या दोनच विमान सेवा सुरू आहेत. 15 मार्चपासून इंडिगोची विमान सेवा (IndiGo Airlines) सुरू होत असल्याने नाशिककरांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
गोवा, नागपूर, हैदराबाद आणि अहमदाबाद अशा चार शहरांसाठी इंडिगोने घोषणा केली आहे. त्यासाठी 1 फेब्रुवारीपासून बुकिंग घेण्यास प्रारंभ केला आहे. इंडिगोच्या बर्याच सेवा या कोलकत्ता, कानपूर, बेंगळूर, चंदीगढ, चेन्नई, दिल्ली, इंदूर, जयपूर, लखनौ, मंगळूर, कोझीकडे, तिरूपती, विशाखापट्टणम अशा शहरांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांना नवनवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
शहरातून जाणारे व देशभरातून शहरात येणार्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. धार्मिक, उद्योग, शेती उत्पादने, वाईन व राजकिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गतिमान प्रवासासाठी विमान सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विमान सेवेसाठीच्या बैठकीत स्पाईस जेटचे उपव्यवस्थापक (Deputy Manager of Spice Jet) नीरज रमेश जैन, सहायक महाव्यवस्थापक रशिद कुट्टी, ’तान’चे अध्यक्ष सागर वाघचौरे, उपाध्यक्ष मनोज वासवानी, लघुउद्योग भारतीचे सचिव निखिल तापडिया, आयसीआयचे अध्यक्ष सोहिल शहा, उपाध्यक्ष राकेश परदेशी आदींनी नमुद केले.