Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्याKumbhmela 2026-2027 : कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री भुसे

Kumbhmela 2026-2027 : कुंभमेळ्यासाठी आराखडा तयार करा : पालकमंत्री भुसे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

.आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन 2026-27 सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वंकष आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

- Advertisement -

आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन 2026-27 पूर्वतयारीसाठीं जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. हेमंत गोडसे, आ. हिरामण खोसकर, नितीन पवार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदीं मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले कीे, नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा आयोजित करण्यात येतो. या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी राज्य शासनाने शिखर, उच्चाधिकार व जिल्हा स्तरावर विविध समित्या गठित केल्या आहेत. शासन निर्णयाचे अवलोकन करण्याबरोबरच सिंहस्थ कुंभ मेळा आयोजनासंदर्भात प्रशासकीय अधिकार्‍यांनी अलाहाबाद, उज्जैन, हरिद्वार या ठिकाणी भेट देऊन संबंधितांचे अनुभव माहिती जाणून घ्यावी.

तसेच, आराखडा अंतिम करण्यापूर्वी सामान्य नागरिकांसह शहरातील आर्किटेक्ट, अभियंत्यांच्या सूचना मागविण्यात याव्यात, त्यासाठी अ‍ॅप विकसित करावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन 2026-27 च्या नियोजनाच्या अनुषंगाने साधुसंत, महंत, भाविक यांना स्वच्छ पेयजल, पुरेशी वीज व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षा व्यवस्था आदि सोयीसुविधांचा बारकाईने विचार करावा. यासंदर्भात संकेतस्थळ विकसित करावे. आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, सेवाभावी संस्था आदिंच्या बैठका घेऊन त्यांच्या योग्य सूचना विचारात घ्याव्यात.

यावेळी नरहरी झिरवळ आणि खा. हेमंत गोडसे, आ. हिरामण खोसकर यांनी मौलिक सूचना केल्या. महानगरपालिकेच्या व त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या वतीने आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कुंभमेळा इतिहास, मागील कुंभमेळा गोषवारा, साधुग्राम क्षेत्र, मनुष्यबळ, आव्हाने, गर्दी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, रस्ते, घाटांचा विकास, सिंहस्थ सुविधा केंद्र, दिशादर्शक फलक, आणिबाणी घटना पूर्वतयारी आदिंचा आढावा घेण्यात आला.

बैठकीच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा तत्त्वावर नोकरी प्राप्त उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक यांना प्रातिनिधीक स्वरूपात निवडशेणी लाभ प्रदान करण्यात आला.

त्र्यंबकेश्वरसाठी स्वतंत्र बैठक

कुंभमेळ्याच्या निमित्ताने विविध शक्तीस्थळे आणि शद्धास्थाने येथील सोयीसुविधांचाही विकास होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे सांगून त्र्यंबकेश्वरसाठीं स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा सन 2026-27 च्या औचित्याने शहर, जिल्ह्याच्या विकासाची संधी मिळाली असल्याचा विचार आराखडा तयार करताना ठेवावा. हा विकास पुढील पिढीसाठी शाश्वत ठरेल. यातून देशात, राज्यात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल होईल, आराखडा तयार करताना चौकटीबाहेर सृजनात्मक काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...