येवला | प्रतिनिधी | Yeola
तालुक्यातील अनकाई परिसरात (Ankai Area) बिबट्याचा (Leopard) वावर असल्याने परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, वनविभागाने (Forest Department) तांडा भागात बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावला आहे.
अनकाई किल्ला येथील वसंतनगर परिसरात मंगळवार (दि. २८) रोजी रात्री दीडच्या सुमारास रेल्वे लाइन लगत असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ बिबट्या दिसून आला. या बिबट्याने दोन दिवसात एक शेळी फस्त केली तर एका शेळीला जखमी केले. तर खिर्डीसाठे येथील योगेश इप्पर हे रात्री दुचाकीवरून परतत असताना त्यांना बिबट्या दिसून आला. यामुळे अनकाई परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान, अनकाई परिसरात वनविभागाचे क्षेत्र असून यात गेल्या काही महिन्यांपासून नर-मादी व बछडा असे बिबट्याच्या एका कुटुंबाचा वावर असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तर गेल्या काही महिन्यात बिबट्याने वसंतनगर परिसरातील रहिवाशांच्या शेळ्यांचा (Goats) बळी घेतला आहे.