Sunday, July 21, 2024
HomeनाशिकNashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर विविध जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Rain) बरसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी पावसाने नाशकात (Nashik) हजेरी लावली होती. पंरतु, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे पुन्हा पाऊस कधी कोसळणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानंतर अखेर आज सकाळी पावसाने शहरातील काही भागांत हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागिरकांना काहीसा दिलासा मिळाला.

हे देखील वाचा : Nashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास पावसाने शहरातील मेनरोड, सीबीएस, शालिमार, या परिसरासह इतर ठिकाणी तुरळक हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांची चागलीच तारांबळ उडाली. तसेच काही नागरिकांनी लपण्यासाठी दुकानांच्या गाळ्यांचा आडोसा घेतल्याचे पाहायला मिळाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या