Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार तालुक्यातील मुसळधार पावसाची हजेरी

नंदुरबार तालुक्यातील मुसळधार पावसाची हजेरी

नंदुरबार। Nandurbar प्रतिनिधी

नंदुरबार शहरासह जिल्हयात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीजांचा कडकडाटांसह (lightning strikes) मुसळधार पावसाने (torrential rain) हजेरी लावली. पावसामुळे वातावरण गारवा निर्माण झाला असून शेतीच्या कामांना वेग (Accelerate farm work) आला आहे. सुमारे एक तास वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी समाधान (Satisfaction by farmers) व्यक्त केले आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सातपुडा पर्वत रांगासह (Satpuda mountain range) धडगांव, शहादा, तळोदा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यांमध्ये मान्सुनचे आगमन (arrival monsoon) झाले होते. मात्र नंदुरबार शहर व तालुक्यात पावसाची प्रतिक्षा होती. आज दि. 13 जून रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ढगांचा व वीजांचा कडकडाटासह (lightning strikes) मुसळधार पावसाने (torrential rain)नंदुरबार शहरासह तालुक्यातील काही भागात हजेरी लावली. दरम्यान दोन दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत होता. मात्र आज अचानक सायंकाळी 5 वाजेपासून वादळीवार्‍यासह जोरदार हवा सुरू झाली. त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. सुमारे एकतास पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला (Satisfaction by farmers) आहे. नंदुरबार शहरात झालेल्या पावसामुळे मंगळ बाजार, भोईगल्ली, गणपती मंदिर, सुभाषचौक परिसर आदी ठिकाणी परिसरात पाणी साचली होते.

तळोदा तालुक्यात वादळी वार्‍यांचा तडाखा

तळोदा दि 13 (ता.प्र) तालुक्यातील पश्चिम पट्यात झालेल्या वादळी वार्‍यांमुळे (Due to strong winds) राणापूर, काकलपूर, शेळवाई, उमरकुवा, रतनपाडा, अंमलपाडा, इच्छागव्हान आदी भागातील गावामध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. वार्‍याचा वेगळा एवढा होता की, पत्रे अक्षरशः 2 ते 4 किमी अंतरापर्यंत उडून गेले आहेत. याप्रसंगी अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी कोणी पलंगाखाली तर कोणी सुरक्षित ठिकाणी जाऊन स्वतःचा जीव वाचवलं, या कालावधीत नागरिकांचे जीव भांड्यात पडले होते. या घटनेत 2 ते 3 जणांना गंभीर जखमी झाल्या आहेत, सुदैवाने यात जीवित हानी टळली.

- Advertisment -

ताज्या बातम्या