Monday, May 4, 2026
Homeमुख्य बातम्याPresident Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरचा थोडक्यात अपघात टळला;...

President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरचा थोडक्यात अपघात टळला; काय घडली घटना ?

तिरूवनंतपुरम |Thiruvananthapuram

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) केरळ (Keral) दौर्‍यावर आहेत. तिथे त्यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. पत्तनामथिट्टाच्या प्रमदम स्टेडियमच्या हॅलिपॅडवर (Helipad) राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरच (Helicopter) लँडिंग होताच ते थोडं आत रुतलं. एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या वजनाने हॅलिपॅडचा एक भाग जमिनीत रुतला. कुठली मोठी घटना झाली नाही. तिथे तैनात असलेले पोलीस आणि फायर डिपार्टमेंटच्या लोकांनी हेलिकॉप्टरला (Helicopter) रुतलेल्या भागातून बाहेर काढलं. याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. यात रुतलेल्या हेलिकॉप्टपरला बाहेर काढण्यासाठी जोर लावला जात असल्याचं दिसतं. सुरुवातीला पंबाजवळील निलक्कल येथे लँडिंगचे नियोजन होते, परंतु खराब हवामानामुळे ते प्रमदममध्ये बदलण्यात आले. तथापि, राष्ट्रपती मुर्मू यांनी कोणताही विलंब न करता रस्त्याने आपला प्रवास सुरू ठेवला.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, ज्या हॅलिपॅडवर ही दुर्घटना घडली तो नवीन आहे. हेलिकॉप्टरने (Helicopter) हॅलिपॅडवर लँडिंग केल्यानंतर खड्डे बनले. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितलं की, शेवटच्या क्षणी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी स्टेडियमची निवड करण्यात आली होती. म्हणून मंगळवारी रात्री तिथे हॅलिपॅड (Helipad) बनवण्यात आलं. आधी राष्ट्रपतींच विमान पंबा जवळ निलक्कल येथे उतरवण्याची योजना बनवण्यात आलेली होती. पण खराब हवामानामुळे हॅलिकॉप्टर (Helicopter) इथे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँक्रीट घट्ट बसलं नव्हतं. त्यामुळे हॅलिकॉप्टरने लँडिंग करताच हॅलिपॅडला वजनाचा भार सहन करता आला नाही. त्यामुळे चाकांमुळे तिथे खड्डे बनले.

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाचे असे आहे नियोजन

राष्ट्रपती मुर्मू 21 ऑक्टोंबर रोजी केरळ तिरूवनंतपूरम (Thiruvananthapuram)येथे पोहोचल्या. आज राष्ट्रपती मुर्मू यांनी शबरीमाला मंदिराला भेट दिली. त्यानंतर गुरुवारी त्या तिरुवनंतपुरम येथील राजभवनात माजी राष्ट्रपती केआर नारायणन यांच्या प्रतिमेचं अनावरण करणार आहेत. वर्कला येथे शिवगिरी मठ येथे श्री नारायण गुरुंच्या महासमाधी शताब्दी समारोहाच उद्घाटन करणार आहे. त्या शिवाय राष्ट्रपती कोट्टायम जिल्ह्यात पाला येथील सेंट थॉमस कॉलेजच्या 75 वर्ष पूर्ण होण्याच्या सांगता समारंभात सहभागी होतील. 24 ऑक्टोंबरला त्या एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. त्यानंतर त्यांचा केरळ दौरा समाप्त होणार आहे.

ताज्या बातम्या

Tamil Nadu Election Result : तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांना जोरदार धक्का!...

0
चेन्नई । Chennai दक्षिणेतील राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांचे नाते जुनेच आहे, मात्र आज तामिळनाडू विधानसभेच्या मतमोजणीत एका नव्या पर्वाचा उदय होताना दिसत आहे. सुपरस्टार विजय...