Monday, May 27, 2024
Homeनगरराष्ट्रपती आज घेणार शनिदर्शन

राष्ट्रपती आज घेणार शनिदर्शन

सोनई |वार्ताहर| Sonai

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज शनिशिंगणापूरला शनी दर्शनासाठी येणार आहेत. राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्याने मोठी तयारी सुरू आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी सलग दोन दिवस सर्व ठिकाणी तयारीची पाहणी केली. नगर संभाजीनगर रस्त्यावर झापवाडी शिवारात तीन हेलिपॅड बनविण्यात आले आहे.

- Advertisement -

तेथून मोटारीने शनी शिंगणापूर येथे येऊन दर्शन पूजा झाल्यावर राष्ट्रपती परत हेलिपॅडकडे रवाना होणार आहे . बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर पासून सकाळपासूनच परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. केंद्र व राज्याची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम तसेच शनेश्वर देवस्थानचे सर्व विभाग दिवस रात्र नियोजन करत आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी शनिशिंगणापूरला आगमन होणार आहे. उदासी महाराज सभा मंडपात अभिषेक व चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करणार आहे. येथील जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपती दर्शनानंतर भोजन करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या