Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यागौरवास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी घेतली सुखोई-३० एमकेआयमधून भरारी

गौरवास्पद! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी घेतली सुखोई-३० एमकेआयमधून भरारी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी आपल्या धाडसाचे ऐतिहासिक दर्शन घडवत आज, शनिवारी तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून (Tezpur Air Force Station) ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानाने उड्डाण केले.

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वायुदलातील पायलटच्या वेशामध्ये द्रौपदी मुर्मू यांनी या महत्वाच्या लढाऊ विमानाने उड्डाण करत त्यांनी धाडसाचे दर्शन घडविले आहे. भारतीय संविधानानुसार ( Constitution of India) राष्ट्रपती हे पद तीनही दलांचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात, तसेच ते देशाचे घटनात्मक प्रमुखही असतात त्यामुळे देशाच्या संरक्षण सज्जतेचा आढावा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्या-त्या वेळचे राष्ट्रपती घेत असतात.

याआधी 2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Former President Pratibhatai Patil) यांनी देशातील या अत्याधुनिक लढाऊ विमानाने उड्डाण केले होते. अशा लढाऊ विमानांनी उड्डाण घ्यायला मोठे धाडसही असावे लागते यामुळे त्यांचेही सर्वच स्तरातून कौतुक झाले होते.

आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेजपूर एअर फोर्स स्टेशनवरून सुखोई Su-30MKI (Sukhoi Su-30MKI) लढाऊ विमानाने उड्डाण केल्याने त्यांचा हा निर्णय ऐतिहासिक दुष्टीने महत्वाचा ठरला आहे.

अजित पवारांनी ‘नॉट रिचेबल’च्या वृत्तावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

तिन्ही सैन्यांचे सर्वोच्च कमांडर (Commander) असल्याने त्यांना सैन्याची शक्ती, शस्त्रे आणि धोरणात्मक माहिती दिली जाते. राष्ट्रपती मुर्मू यांच्या आधी माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, प्रतिभा पाटील आणि रामनाथ कोविंद यांनीही हवाई दलाच्या लढाऊ विमानातून उड्डाण केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राष्ट्रपती सारख्या महत्वाच्या पदावरील व्यक्तीने अशापद्धतीने लढाऊ विमानातून (fighter jet) उड्डाण घेणे, प्रत्यक्ष अनुभव घेणे हे संरक्षण दलाच्या मनोबलाला उंचाविण्याच्या दुष्टीनेही महत्वाचे असते म्हणून त्यांची ही भरारी निश्चितच गौरवास्पद असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या