Monday, May 20, 2024
Homeनगरराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनीदर्शन !

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनीदर्शन !

गणेशवाडी |वार्ताहर| Ganeshwadi

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल गुरुवारी दुपारी शनिशिंगणापूर येथे येऊन शनि दर्शन घेतले. सुरेक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देशाच्या राष्ट्रपतींने शनि दर्शन घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंदिर परिसरात आगमन झाल्यावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केले.

- Advertisement -

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मंदिर परिसरात त्यांचे आगमन झाल्यावर जनसंपर्क कार्यालयात आगमन झाले. त्यानंतर उदासी महाराज मठात पुजार्‍यांनी मंत्रघोषात अभिषेक केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौथर्‍यावर जाऊन शनी मूर्तीस तेल अर्पण केले. अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर यांनी शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन राष्ट्रपतींचा सन्मान केला.

दर्शन झाल्यावर जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रपतींनी प्रसादलयाचे महाराष्ट्रीयन जेवण घेतले. संपूर्ण शिंगणापूर परिसरात बेरेकेटिंग केले होते. सर्व वाहनतळ बंद करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून शिंगणापूर गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनि अभिषेक केल्यावर त्या जनसंपर्क कार्यालयात आल्या. त्यावेळेस सोबत असणार्‍या दिल्लीच्या अधिकार्‍यांनी स्वतःहून तेलाचे पैसे दिले. ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच मंदिर परिसरात येऊ दिले जात होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या