Friday, November 22, 2024
Homeनाशिकनाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक

नाशिकच्या पोलिसांचा गौरव; सात अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पदक

नाशिक | प्रतिनिधी

काल स्वांत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक ग्रामीणचे पाच तर शहर पाेलीस दलाच्या दाेन अधिकारी व अंमलदारांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून (Union Ministry of Home Affairs) राष्ट्रपती पोलिस पदक (President Medal) जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू संपत सुर्वे यांचाही यात समावेश आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : PM Modi Speech : एक देश, एक निवडणूक ते महिलांची कामगिरी; मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे, महिला उपनिरीक्षक मोनिका थॉमस, उपनिरीक्षक बंडू ठाकरे, अंमलदार अरुण निवृत्ती खैरे, दिपक टिल्लू यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यापैकी सुर्वे यांनी इगतपुरी व मुंबई गुन्हे शाखा, नाशिक एलसीबीत उल्लेखनीय सेवा बजाविली आहे. यासह दोन्ही उपनिरीक्षकांच्या कर्तव्याची दखल वेळोवेळी घेण्यात आली आहे. तसेच उर्वरित अंमलदारांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा बजाविली आहे.

हे देखील वाचा : संपादकीय : १५ ऑगस्ट २०२४ – बहिरेपण टाळण्याचे सज्ञान येईल का?

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील उपनिरिक्षक गणेश मनाजी भामरे व दत्तू रामनाथ खुळे यांनाही राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे. यापैकी खुळे हे सन १९९० मध्ये पोलिस दलात शिपाई पदावर रूजू झाले. त्यांनी नाशिकरोड, भद्रकाली, गुन्हेशाखा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, आडगाव, आर्थिक गुन्हे शाखेत सेवा बजावली आहे. त्यांना नुकतीच पदोन्नतीने उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. ३३ वर्षांच्या सेवेत त्यांना २८६ रिवॉर्डस्‌ आणि ५ प्रशंसापत्र मिळाले आहेत.

हे देखील वाचा : Independence Day 2024 : वैद्यकीय शिक्षणासंदर्भात PM मोदींची महत्वपूर्ण घोषणा

तसेच गणेश भामरे हे सन १९९१ मध्ये शहर पोलिसांत रूजू झाले. त्यांनी पोलिस मुख्यालय, सरकारवाडा, भद्रकाली, शहर वाहतूक शाखा, पंचवटी, गुन्हेशाखा, अंबड, सातपूर, अंमली पदार्थविरोधी पथकात सेवा बजावली. त्यांनाही नुकतीच पदोन्नतीने उपनिरीक्षकपदी बढती मिळाली आहे. त्यांनी चैनस्नॅचिंगचे १७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. यासह अंमली पदार्थविरोधी पथकात एमडी ड्रग्ज हस्तगत केले होते. सेवाकाळात त्यांना २३९ रिवॉर्डस्‌ आणि १५ प्रशंसापत्रे मिळाले आहेत.

हे देखील वाचा : independence Day 2024 : राष्ट्रपतींसह, PM मोदींनी जनतेला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

तर, अरुण खैरे यांनी सन १९९१ चा सिंहस्थ कुंभमेळा बंदोबस्त आटोपल्यानंतर ६ महिने दाैंड येथील नानवीज येथे ट्रेनिंग पूर्ण केले. सन १९९४ ते सन २००४ पर्यंत नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयात वाचक शाखेत कर्तव्य बजावले. सन २०२४ पासून ते पावेतो पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत आहेत. ३३ वर्षाच्या सेवेत त्यांना ४६५ बक्षीसे मिळालेले आहेत. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या