Wednesday, February 4, 2026
Homeदेश विदेशGovernor Appointment : पाच राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणत्या राज्यात कोणाची नियुक्ती?

Governor Appointment : पाच राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणत्या राज्यात कोणाची नियुक्ती?

दिल्ली । Delhi

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -

तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंग यांना मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून यासंदर्भात एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे.

YouTube video player

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यात मणिपूर, मिझोराम, केरळ, बिहार आणि ओडिसा या राज्यांचा समावेश आहे. माजी लष्कर प्रमुख जनरल विजय कुमार सिंह यांना मिझोरामच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारची जबाबदारी देण्यात आली आहे. मणिपूरच्या राज्यपालपदी माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, छत्तीगडचे भाजपा नेते आणि ओडिसाचे विद्यमान राज्यपाल रघुबर दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती मुर्मू यांनी दास यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यानंतर मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभमपति यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून बदली करण्यात आली आहे.

बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना केरळचे राज्यपालपद देण्यात आले आहे. तर केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजय कुमार भल्ला यांना मणिपूरचे राज्यपाल म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवनियुक्त राज्यपाल ज्या दिवशी कार्यभार स्वीकारतील, त्या दिवसापासून या नियुक्त्या लागू होतील.

ताज्या बातम्या

Malegaon MC Politics : महापौर-उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना-एमआयएमची उडी; नाट्यमयरित्या अर्ज...

0
मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी (Mayor and Deputy Mayor Election) काल (मंगळवारी) अंतिम मुदतीत शिवसेनेने महापौर व उपमहापौरपदासाठी तर एमआयएम पक्षाने उपमहापौर...