Saturday, May 25, 2024
Homeनाशिकनाशिकमधील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक

नाशिकमधील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस विभागातील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक (Presidents Police Medal) जाहीर झाले आहे. आज विभागीय आयुक्तालयात होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे…

- Advertisement -

ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे (Ashok Ahire), शहर गुन्हे विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत पाटील (Anant Patil) आणि शहर नियंत्रण विभागातील संतोष खिंडे (Santosh Khinde) यांना पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी हे पदक देण्यात येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक अशोक अहिरे हे १९८३ पासून सेवेत आहे. त्यांना २००४ मध्ये राष्ट्रपती पोलीस पदकासह ४०३ बक्षिसे मिळाली आहे. त्यांनी मालेगाव, नाशिक शहर, जळगाव, यावल, साक्री आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत पाटील हे १९८७ पासून सेवेत आहे. ३३ वर्षात त्यांनी जळगाव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गुन्हे शाखा आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. २०१७ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले होते.

शहर पोलीस दलात नियंत्रण विभागात कार्यरत असलेले पोलीस संतोष खिंडे यांना सेवेमुळे राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. त्यांची पोलीस खात्यात ३२ वर्षे सेवा पूर्ण झालेली असून त्यांना आतापर्यंत २७ ‘अ +’ शेरे व २९३ बक्षिसे मिळाली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या