जुने नाशिक | प्रतिनिधी
अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असतानाच नाशिकमध्ये राजकीय हालचालींपाठोपाठ मोठे राडे पहायला मिळत आहे. अनेक प्रभागांमध्ये उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. प्रभाग क्रमांक १४ ड मधून अपक्ष उमेदवार नंदू कहार यांच्यावर माघारीसाठी आमदारांकडून दबाव आणण्यात आल्याचा खळबळजनक आरोप कहार यांनी केला आहे. मात्र अर्ज माघारी न घेण्याच्या पवित्र्यामुळे मोठा गोंधळ पहायला मिळाला.
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यावर उमेदवार नंदू कहार यांनी आरोप केला की, प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपाने एकही उमेदवार दिला नाही, आम्ही उमेदवारी मागत असतानाही आमचा विचार केला गेला नाही. शेवटच्या क्षणी माझ्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आर्थिक प्रलोभन देत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक पाठबळामुळे मी अर्ज माघारी घेणार नाही असा पवित्रा नंदू कहार यांनी घेतला. तर दुसरीकडे प्रभाग क्र. १४ क मधून त्यांच्या पत्नीने हिंदू समाजासाठी आपण माघार घेत असल्याचे सांगितले.
Nashik Municipal Corporation Election: मोठी बातमी! भाजपचे उमेदवार दिपक बडगुजरांची माघार
दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिकमध्य विभागामध्ये शेवटच्या मिनिटांपर्यंत मोठा राडा पहायला मिळाला आहे.




