Saturday, May 4, 2024
Homeधुळेऊसतोडणी कामगार पुरविण्याचा बहाणा ; १२ लाखात फसवणूक

ऊसतोडणी कामगार पुरविण्याचा बहाणा ; १२ लाखात फसवणूक

धुळे । प्रतिनिधी dhule

ऊस तोडणीसाठी कामगार पुरविण्याच्या बहाण्याने सांगली जिल्ह्यातील दोघांची बारा लाखात फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गरताड व सोनशेलूतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

महावीर आदगौडा (वय 54 रा. ऐतवडे ता. वाळवा जि. सांगली) यांनी शिरपूर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना वारणा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊसतोड व वाहतूकीसाठी 24 मजुर पुरवितो, असे सांगून विश्वनाथ नथ्थु भिल (रा. गरताड ता. शिरपूर) याने नोटरी करून त्यांच्याकडून एकुण आठ लाख 75 हजार 26 रूपये घेतले. मात्र ऊसतोड व वाहतूकीसाठी मजुर न पुरविता फसवणूक केली. हा प्रकार दि. 6 जुलै 2021 ते 4 जुलै 2022 दरम्यान घडला. याप्रकरणी विश्वनाथ भिल याच्याविरोधात भादंवि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय सोनवणे हे करीत आहेत.

तर दुसरी तक्रार युवराज काशिनाथ पाटील (वय 40 रा. इटकरे ता.वाळवा जि.सांगली) या शेतकर्‍याने शिंदखेडा पोलिसात दिली आहे. त्यानुसार, अनिल झिंगा ठाकरे (रा. सोनशेलू ता.शिंदखेडा) याने सन 2018 ते 2019 चे गळीत हंगामासाठी ऊसतोड व भरणीसाठी ऊसतोड कामगार पुरवितो,असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यासाठी रोख व बँक खात्यावर एकुण चार लाख 10 हजार रूपये घेतले. मात्र त्यानंतर ठरविल्याप्रमाणे कामगार पाठविले नाही आणि पैसे देखील परत न करता फसवणूक केली. पुढील तपास पोहेकाँ चव्हाण हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या