Thursday, November 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजझिरवाळांमुळे जांबुटकेत जमिनीला सोन्याचे भाव : अपसुंद

झिरवाळांमुळे जांबुटकेत जमिनीला सोन्याचे भाव : अपसुंद

उमराळे बु. गटात प्रचार दौर्‍याला ना. नरहरी झिरवाळांना प्रतिसाद

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात जांबुटके व अक्राळे एमआयडीसीच्या निर्मितीमुळे तरुणांना रोजगार मिळणार आहे. जांबुटके एमआयडीसीच्या मान्यतेमुळे जांबुटके, मडकीजांब, उमराळे बु., निळवंडी, वनारवाडी इत्यादी परिसरातील जमिनींचे भाव प्रचंड वाढले आहेत. ना. नरहरी झिरवाळ यांच्यामुळे जांबुटके एमआयडीसीला मंजुरी मिळाली व त्यामुळेच या परिसराचा कायापालट होणार आहे, असे प्रतिपादन जांबुटकेचे माजी उपसरपंच अनिल अपसुंदे यांनी केले.

दिंडोरी तालुक्यातील जांबुटके, मडकीजांब, उमराळे बु. परिसरात भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट, रिपाइं महायुतीचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ सभा झाल्या. त्याप्रसंगी अनिल अपसुंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, जांबुटके एमआयडीसी ना. नरहरी झिरवाळ यांनी विशेष प्रयत्न करून मंजूर करून घेतली. या एमआयडीसीमध्ये अनेक उद्योग येण्यास सुरुवात झाली आहे.

दिंडोरी-पेठ तालुक्यातील नवउद्योजकांना फार मोठी संधी ना. नरहरी झिरवाळ यांनी उपलब्ध करून दिली आहे. पुढील काळातही आपल्याला विकासाची गती हीच कायम ठेवण्यासाठी ना. नरहरी झिरवाळ यांनाच निवडून द्यावे लागेल. उमराळे बु. गटातील जनतेने ना. नरहरी झिरवाळ यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे प्रकाश शिंदे यांनी सांगितले. यावेळी मडकीजांब, जांबुटके, रासेगाव, इंदोरे, वनारवाडी, उमराळे बु., तुंगारदरा, धाऊर, देहरेवाडी इत्यादी गावांना ना. नरहरी झिरवाळ यांनी भेटी देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले. प्रत्येक गावात फटाक्यांच्या आतशबाजीत ना. झिरवाळ यांचे स्वागत करण्यात आले.

ना. नरहरी झिरवाळ यांचे महिलांनी औक्षण केले. यावेळी ना. नरहरी झिरवाळ यांनी जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, पुढील काळातही जनतेने असेच प्रेम आपल्यावर करावे व विकासाची गती नवीन उद्योग साधण्यासाठी आपल्याला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मतदान करावे. ना. झिरवाळ यांनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. प्रत्येक गावात ना. झिरवाळ यांनी कामे दिल्याने अनेक लोकप्रतिनिधींनी ना. झिरवाळ यांचे आभार मानले व सहकार्य करण्याचा शब्द दिला. यावेळी दौर्‍यात ज्येष्ठ नेते जे. डी. केदार, प्रकाश वडजे, बाळासाहेब जाधव, भाजप तालुकाध्यक्ष शामराव मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमोल कदम, ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, रिपाइंचे आठवले, शाम बोडके, अशोक टोंगारे, कृष्णा मातेरे आदींसह विविध मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी सर्व ठिकाणी ना. झिरवाळ यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या