Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यावर्षभर डाळींचे दर चढेच राहणार?

वर्षभर डाळींचे दर चढेच राहणार?

पुणे | प्रतिनिधी | Pune

चालूवर्षी पावसाने (Rain) ओढ दिल्याने खरिपाच्या पेरण्या पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी झाल्या आहेत. सद्यस्थितीत नामांकित कंपन्यांकडे डाळींचा मोठा साठा आहे. डाळींचे वाढते दर व अपुर्‍या पुरवठ्यामुळे त्यांनी विक्री थांबविली आहे. तूरडाळीच्या दरवाढीचे हेही एक प्रमुख कारण आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने जे पीक आहे ते जगवणेही शेतकर्‍यांना कठीण बनल्याचे चित्र आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास डाळींच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे…

- Advertisement -

गतवर्षी पावसाने झालेले नुकसान आणि यंदा पावसाने दिलेली ओढ, यामुळे उत्पादन केंद्रात सर्वच डाळींचे दर कडाडले आहेत. यामध्ये सर्वाधिक दरवाढ तूरडाळीची झाली असून, घाऊक बाजारात एक किलो तूरडाळीचे दर १५० ते १६५ रुपयांवर गेले आहेत.

किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीची तब्बल १७० ते १८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. त्यामुळे आम जनता हैराण झाली आहे. हरभराडाळ, उडीदडाळ, मसूरडाळ आणि मूगडाळीच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत किस्सा खुर्चीचा! शरद पवार अन् ममता बॅनर्जींमध्ये नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

गेल्यावर्षी झालेले कमी उत्पादन आणि जागतिक बाजारातील कडधान्यांच्या चढ्या दरांमुळे देशांतर्गत बाजारात डाळींच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तूरडाळ दोन महिन्यांत १०० ते ११० रुपयांवरून १७० ते १८० रुपयांवर गेली आहे. हरभराडाळ ५७ ते ५८ रुपयांवरून ७० रुपये प्रतिकिलोवर गेली आहे. उडीदडाळ ९० रुपयांवरून ११०  रुपये प्रतिकिलो झाली असून, मसूरडाळीतही किलोमागे दहा-बारा रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मूगडाळ ८० ते ८५ रुपयांवरून ११० रुपयांवर गेली आहे.

आपण हळू हळू हुकूमशाहीकडे; मल्लिकार्जून खरगेंची मोदींवर सडकून टिका

देशभरात खरीप हंगामात कडधान्यांच्या लागवडीत घट झाली आहे. जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाला तरच कडधान्यांची लागवड होते. यंदा जुलैअखेरीस पाऊस झाल्यामुळे कडधान्यांचा पेरा घटला आहे. गेल्यावर्षी २५  ऑगस्टअखेर देशात १२८.०७  लाख हेक्टरवर कडधान्यांची लागवड झाली होती. यंदा ती ११७.४४  लाख हेक्टरवर घसरली आहे. तुरीची लागवड ४२.११ लाख हेक्टर, उडीद ३१.१० लाख हेक्टर, मूग ३०.६४ लाख हेक्टर, कुळीथ ०.२६  लाख हेक्टर आणि अन्य कडधान्यांची १३.३४ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. लागवडीत घट झाल्यामुळे पुढीलवर्षभर डाळींचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

X New Features : आता X वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा… व्हॉट्सअ‍ॅपला आव्हान?

- Advertisment -

ताज्या बातम्या