नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
नाशिकच्या शुभम संजय शेवडे लिखित व दिगदर्शित आणि अपर्णा कुलकर्णी निर्मित ‘मॅगझिन’ या मराठी चित्रपटाची ‘अजिंठा–एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (एआयएफएफ) विविध भारतीय भाषांतील उत्कृष्ट चित्रपटांमध्ये निवड झाली आहे.
येत्या ३१ जानेवारीला संध्याकाळी ४ वाजता आणि ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे पिव्हीआर इनबॉक्स संभाजी स्क्रीन २ वर हा चित्रपट दाखविला जाणार आहे.
बालपणीच्या पहिल्या पानापासून ते शहाणपणाच्या पहिल्या पानापर्यंत दडलेल्या शांत आणि गमतीदार आठवणी ‘मॅगझिन’ या चित्रपटात आहेत. विशेष म्हणजे मराठी मुलांनी हा चित्रपट तयार केला असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.




