Tuesday, March 25, 2025
Homeनगर41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

संगमनेरचे निमगाव जाळी जिल्ह्यात प्रथम || राज्यात सर्वाधिक पुरस्कार नगर जिल्ह्याला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात व आरोग्य संस्थांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्य ठेवावे, यासाठी ‘कायाकल्प’ पुरस्कार योजना राबविण्यात येते. यात नगर जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात 580 आरोग्य केंद्रांना पुरस्कार जाहीर झाले असून यात सर्वाधिक नगर जिल्ह्यातील आहेत.

- Advertisement -

शासनाकडून सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण पध्दतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कायाकल्प’ पुरस्कार योजने अंतर्गत आरोग्य संस्थांना त्यांनी केलेल्या उत्कृष्ट उपाययोजना आधारावर पुरस्कार देण्यात येतो. यामध्ये निर्धारीत मानक पूर्ण करणार्‍या आरोग्य संस्थांना रोख रकमेचे पुरस्कार देण्यात येतात. राज्यातील 580 प्राथमिक आरोग्य केंद्रांना ‘कायाकल्प’ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक 41 प्राथमिक आरोग्य केंद्रांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यात जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी या आरोग्य संस्थेस जिल्हांतर्गत प्रथम पुरस्कार मिळाला आहे. 2 लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

जिल्ह्यातील अन्य 40 प्राथमिक आरोग्य केंद्रांनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना सुध्दा प्रोत्साहनपर पुरस्कार घोषित झाले आहे. प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र 50 हजार रूपये आहे. यात नगर तालुक्यातील चास, रूईछत्तीसी, वाळकी, देहरे. पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार, खडकवाडी, निघोज, रूईछत्रपती, पळवे खु. राहुरी तालुक्यातील उंबरे, मांजरी. संगमनेर तालुक्यातील बोटा, निमगावजाळी. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ, आढळगाव. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा, विठा, खिरविरे. नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला, नेवासा बु. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार, तिसगाव, मिरी. राहाता तालुक्यातील कोल्हार बु., दाढ बु., सावळी विहीर, अस्तगाव. कर्जत तालुक्यातील कुळधरण, राशीन. शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने, घोटण, हातगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव- शे. जामखेड तालुक्यातील अरणगाव, नान्नज, खर्डा. कोपरगाव तालुक्यातील टाकळी ब्राम्हणगाव, पोहेगाव यांचा समावेश आहे.

पुरस्कारात मिळणार्‍या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी व 25 टक्के रक्कम अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी संस्था अंतर्गत आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधीचा विनियोग मार्गदर्शक सुचनांनुसार प्रमाणे करण्यात येणार आहे. या योजना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद काकडे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय गायकवाड, जिल्हा गुणवत्ता आश्वासन समिती समन्वयक, डॉ. अमृता यांनी मार्गदर्शन केले. लवकरच संबंधित संस्थांना जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...