Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशगोध्रा जळीतकांड : मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक

गोध्रा जळीतकांड : मुख्य आरोपीला १९ वर्षांनंतर अटक

दिल्ली l Delhi

- Advertisement -

देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या या हत्याकांडामधील मुख्य आरोपी १९ वर्षानंतर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा स्थानकावर साबरमती एक्स्प्रेसच्या एक डब्याला लावलेल्या आगीप्रकरणातील मुख्य आरोपी रफीक हुसैन भटुक याला गोध्रा शहरातून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. १९ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचा डब्बा जाळण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करणे, जमवाला भडकवणे आणि संपूर्ण कट रचण्यात रफीक हुसैनचा मोठा हात होता. त्याच्यावर मर्डर आणि दंगल भकडवण्याचा चार्ज लागलेला आहे. तसेच रफीक हुसैन त्यावेळी एक मजूर म्हणून स्टेशनवर काम करत होता. जेव्हा ट्रेन आल्यानंतर दगडफेक करण्यात आली आणि पेट्रोल टाकण्यात आले, तेव्हा हा सुद्धा त्यांच्यापैकी एक होता. परंतु त्या घटनेनंतर रफीक हुसैन येथून पळून गेला आणि दिल्लीच्या जवळपास राहू लागला. त्याचबरोबर पोलिसांनी सांगितले की, नुकतेच आम्हाला त्याबाबत माहिती मिळाली आणि त्याने कुटुंबाला येथे आणल्याची माहिती मिळाली. आता तो घरी भेटण्यासाठी आला असताना पोलिसांनी त्यास पकडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या