Friday, April 25, 2025
Homeनगरपंतप्रधान सहायता निधीची रक्कम वाढवा : खा. लंके

पंतप्रधान सहायता निधीची रक्कम वाढवा : खा. लंके

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत रुग्णांना देण्यात येणारी 3 लाख ही कमाल रक्कम वाढविण्यात यावी तसेच एका सदस्याची 35 रुग्णांची मर्यादा हटवून ती अमर्याद करण्याची आग्रही मागणी नगरचे खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी (16 डिसेंबर) लोकसभेत केली. खा. लंके म्हणाले, पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत देण्यात येणारी कमाल रक्कम तीन लाख रूपये आहे.

- Advertisement -

आजाराचा संपूर्ण खर्च भागविण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसून ही मर्यादा वाढविण्याची गरज आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधीअंतर्गत एक वर्षात एका सदस्याला 35 रूग्णांना मदत करता येते. ही मर्यादा योग्य नाही. ही मर्यादा काढून टाकून ती अमर्याद करण्यात यावी, अशी मागणी लंके यांनी केली. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत नेमण्यात आलेल्या पॅनलमध्ये रूग्णालयांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. ही संख्या लवकरात लवकर वाढवून एका तालुक्यात किमान एक रूग्णालय या पॅनलमध्ये घेण्याची मागणीही लंके यांनी केली.

पंतप्रधान राष्ट्रीय निधी अंतर्गत पाठविण्यात येणारे प्रस्ताव हे पोष्टाने मागविले जातात. त्यात बदल करून हे प्रस्ताव ऑनलाईन मागविण्यात यावेत जेणेकरून रूग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल असेही लंके यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत एखादा विशेष बाब हा पर्याय असायला हवा. एखाद्या रूग्णाचा आजार सुचीमध्ये नसेल तर विशेष बाब या पर्यायातून त्या रुग्णाला मदत करता येईल. असेही लंके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, एक वर्षात एका सदस्याला 35 रूग्णांना मदत करता येते. खा. नीलेश लंके यांनी या योजनेअंतर्गत अनेक प्रस्ताव दाखल केले असून सहा महिन्यात त्यांचा कोटा संपला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...